fire accident in Chandrapur today : चंद्रपूर- शहरातील जनता कॉलेज परिसरात असलेल्या जेबी आर्ट अँड स्टेशनरी या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात ८ जणांचा मृत्यू, कारण काय?
ही घटना सोमवार, पहाटे ४ वाजता घडली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला सूचना दिली. चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग नियंत्रणात आली.
सदर जेबी आर्ट अँड स्टेशनरी हे दुकान जीवन धकाते यांचे असून, स्टेशनरी साहित्य, आर्ट मटेरियल्स, गिफ्ट आइटम्स यांचा मोठा साठा या दुकानात होता. आग इतकी भीषण होती की संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुकानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे आणि महत्त्वाचे साहित्य राखरांगोळी झाले आहे. stationery shop fire accident
स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान झाल्यामुळे धकाते यांना मोठा धक्का बसला आहे.
Powered by myUpchar
या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Leave a Comment