male tiger । १५ वर्षांचा वाघ जंगलात मृत! चंद्रपूर हादरलं… नेमकं काय घडलं?

January 17, 2026 by Prakash Hande

male tiger found dead in forest area : चंद्रपूर - 15 ते 16 वर्षाच्या एका नर जातीच्या वाघाचा मृतदेह आज मंगळवारी (24 जून) ला दुपारी साडेबाराचे सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सरांडी गावालगतच्या जंगलात आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून चंद्रपूर येथील टीटीसी सेंटरला हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. एका भल्या मोठ्या वाघाचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

चंद्रपूर शासकीय आयटीआय मध्ये रोजगार मेळावा


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटात सरांडी गावालगत जंगलात काही नागरिकांना आज मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघाचा मृतदेह कंपार्टमेंट नंबर 45/609 मध्ये दिसून आला. लगेच या बाबतची माहिती नवगाव येथील उपवनक्षेत्र कार्याल्याला देण्यात आली. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाला माहिती दिली. tiger death investigation forest department

 

सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी अंजली भोरीवार, क्षेत्रसहायक एस.बी उसेंडी, दीड वाजताचे सुमारास घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात घटनास्थळी वाघाचा मृत्यू झालेला होता. 15 ते 16 वयाचा नर जातीचा वाघ आहे. वाघाचे सर्व अवयव शाबुत आहेत. ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सदर घटनास्थळाची व वाघाच्या मृतदेहाची पहाणी केली.

 

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=sQoJst4xEQ6oqkF6

वनविभागात खळबळ

वाघ 15 ते 16 वर्ष वयोगटाचा असल्याने मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. एका मोठ्या वाघाचा मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे.
सदर वाघाचा मृतदेह चंद्रपूर येथील टीटीसी सेंटरला पाठविण्यात आला असून त्या ठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

Leave a Comment

+