IPL betting impact on youth -आजच्या आधुनिक युगात बेरोजगार तरुण ऑनलाईन माध्यमातून बक्कळ पैसे कमवू शकतात, मात्र त्यासाठी मार्ग हे साधे किंवा खडतर असतात. यासाठी शिक्षण हे गरजेचं असते का? तर काही ठिकाणी शिक्षणाला महत्व तर काही ठिकाणी आपल्याला समजण्याइतकं मोबाईल ज्ञान हवे. ऑनलाईन माध्यमातून पैसे कमविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहे मात्र चंद्रपुरात थोडे पैसे देऊन आपण ३ तासात लाखो रुपये कमवू शकतो. IPL betting addiction signs
२२ मार्चपासून आयपील क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली असून यासाठी सध्या अनेक क्रिकेट सट्टेबाज सक्रिय झाले आहे, तरुणाईला जुगाराच्या विळख्यात आणण्याचे प्रयत्न या सट्टेबाजांकडून सुरु आहे. आपल्याला या सट्टेबाजांसोबत काम करायचे असल्यास सहजपणे आपण त्यांच्या संपर्कात येऊ शकतो पण अजूनही पोलीस विभाग यांच्या संपर्कात जसा यायला हवा तसा आला नाही. Youth gambling prevention strategies
चंद्रपुरात आयपीएल सट्टेबाजीला सुरुवात
चंद्रपुरात असलेल्या सट्टेबाजांच्या बॉक्स ला अनेक तरुणाई जुळली आहे. Nice7777 नंतर आता Nice45 या ऑनलाईन वेबसाईटचा धुमाकूळ सुरु झाला आहे. हे नेटवर्क चालविणारे सट्टेबाज यांचं शिक्षण कमी पण प्रशिक्षण मात्र चांगलं आहे, शासकीय अधिकरी महिन्याला जितका पगार कमवितो तितका पगार हे एका तासात कमवितात, कारण याच्यामागे राजकीय नेत्यांचं चांगलं पाठबळ व पोलीस प्रशासन आपलं काही बिघडवू शकत नाही अशी भावना यांच्या मनात रुजलेली आहे. Impact of online gambling on Indian youth
२० वर्षांपासून घरफोडी शिकला, ६० व्या वर्षी पोलिसांच्या हाती लागला
पोलिसांनी कारवाई जरी केली तर लगेच जामीन होतो, कायदा तसाच आहे, मात्र हे नेटवर्क संघटित गुन्हेगारीच्या श्रेणीत येत असल्यावर सुद्धा यांच्या त्या पद्धतीने कारवाई केल्या जातात नाही हि एक शोकांतिका आहे. कायद्याची कसलीही भीती नसणारे सट्टेबाज आज तरुणाईला जुगाराचे ऑनलाईन व्यसन लावत त्यांचं आर्थिक नुकसान करीत आहे. देशात जुगार व सट्टेबाज यावर प्रतिबंध असला तरीही खुलेआम हे कार्य केल्या जाते त्यासाठी त्यांना आर्थिक क्रांती आणावी लागते.
चंद्रपुरात युवकांना कमी वेळात पैसे कमविण्याची संधी देणारे प्रमुख सूत्रधार अविनाश-राकेश, महेश-राजीक, नीरज-बंटी व प्रदीप अजूनही नावे यामध्ये आहे, युवकांना क्रिकेट जरी खेळता येत नसेल तर त्यांना काही एक घाबरण्याचे काम नाही कारण हे सदरील व्यक्ती त्यांच्यासाठी एक गुरु आहे. युवकांना फक्त घरबसल्या आयपीएल सामने बघत त्यावर पैसे लावायचे आहे, पैसे जिंकलात तर नशीब नाहीतर आर्थिक नुकसान झालंच बघा.
पोलिसांकडे सक्षम यंत्रणा असून सुद्धा ऑनलाइनच्या माध्यमातून सुरु असलेल्या या जुगारावर त्यांचे अद्यापही नियंत्रण नाही, नागपुर-दुबई मधून ऑनलाईन जुगाराची सूत्रे हलविण्यात येतात हि बाब पोलीस यंत्रणेला सुद्धा माहिती आहे. गडचिरोली पोलिसांनी हे नेटवर्क उध्वस्त करण्याचा निर्भीड प्रयत्न केला होता पण त्यानंतर आज हा जुगार लाखो वरून कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचलेला आहे, ज्यामुळे तरुणाई या जुगाराच्या चक्रात फसलेली दिसून येते.
Leave a Comment