Nylon Manja Seized : ब्रह्मपुरी ११ जानेवारी - १० जानेवारी रोजी ब्रह्मपुरी पोलिसांनी बालाजी वार्डातील ओमकार डेली निड्स च्या दुकानावर धाड मारीत जीवघेणा नायलॉन मांजा जप्त केला, या धाडीत ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (नायलॉन मांजा प्रकरणी २८ जणांवर गुन्हे दाखल)
चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या नायलॉन मांजाची विक्री होत आहे, गत वर्षात २८ जणांवर चंद्रपूर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई मोहीम सुरु आहे. १० जानेवारी रोजी डेली निड्स च्या दुकानात जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी बालाजी वॉर्डातील ओमकार डेली निड्स च्या दुकानात धाड मारली, या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा एकूण ३० मग प्लास्टिक चक्री किंमत ३५ हजार रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलीप रामचंद्र गजपुरे यांच्यावर कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सपोनि मनोज खडसे, पोलीस कर्मचारी मुकेश गजबे, निलेश तुमसरे, इरशाद खान, स्वप्नील पळसपगार, वशिष्ठ रंगारी व प्रवीण भिवगडे यांनी केली.
चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले कि आपल्या भागात कुणीही प्रतिबंधित जीवघेणा नायलॉन मांजा बाळगताना किंवा विक्री करीत असेल तर त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष मधील हेल्पलाईन ११२ वर तात्काळ संपर्क करावा.
Leave a Comment