चंद्रपूर महापालिका मतदान: ५ पिंक बूथ व ५ आदर्श बूथ तयार

January 17, 2026 by Prakash Hande

polling booth facilities : चंद्रपूर १४ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.मतदानाची वेळ सकाळी ०७:३० ते संध्याकाळी ०५:३० असुन मतदारांना सुरक्षित, सुलभ व आदर्श मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ५ पिंक बूथ व ५ आदर्श बूथ निश्चित करण्यात आले आहेत. (मतदानासाठी कामगारांना पगारी सुट्टी)

   चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघात २ लक्ष ९९ हजार ९९४ मतदारांसाठी ३५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असुन महिला मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ५ पिंक बूथमध्ये महिला कर्मचारी, सुरक्षित वातावरण, विशेष सजावट व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर आदर्श बूथ हे स्वच्छता, सुव्यवस्थित रचना, योग्य मार्गदर्शन व आदर्श व्यवस्थापनासाठी ओळखले जाणार आहेत. polling booth facilities

    दरम्यान, मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वाटप आज मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून करण्यात आले. या प्रक्रियेसाठी सर्व व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली होती. मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रवेश व बाहेर निघण्याची स्वतंत्र व्यवस्था, विविध पथकांची हजेरी नोंद, नाश्ता व चहाची सोय, साहित्य वाटपासाठी स्वतंत्र टेबल्स, संबंधित मतदान बूथची माहिती,पोलीस प्रशासनाची व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी असलेल्या बसची स्पष्ट व्यवस्था करण्यात आली होती.या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कुठलाही गोंधळ न होता दुपारी ३ वाजेपर्यंत ३९१ पथकांचे एकुण १५६४ कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले.  polling booth facilities

   यावेळी मा. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मा. मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. विजय भाकरे (भा.प्र.से.) यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रशासनाकडून मतदानपूर्व तयारी व साहित्य वाटपाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना निर्भयपणे, शांततेत व उत्साहात मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंक बूथ ठिकाणे :

पोलीस कल्याण सभागृह, पूर्व दिशा, खोली भाग – १
एम.बी. प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, माता मंदिर जवळ, कृष्णनगर, खोली क्र. २
चांदा पब्लिक कॉन्व्हेंट, दाताळा रोड, खोली क्र. ५
रफी अहमद किदवई हायस्कूल, उत्तर बाजू, खोली क्र. १
पॅरामाऊंट कॉन्व्हेंट, नेताजी चौक, बाबुपेठ
आदर्श बूथ ठिकाणे :
बी.जे.एम. कार्मेल अकॅडेमी, तुकूम
अमर शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा, खोली क्र. ४, इंदिरानगर
सेंट मायकल कॉन्व्हेंट, रामनगर
अभ्यंकर मनपा प्राथमिक शाळा, गडला मारोती मंदिराजवळ, खोली क्र. १
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, बाबुपेठ खोली क्र. ३

Leave a Comment

+