Chandrapur Mayor Election update : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचा पेच अजूनही संपला नाही, कांग्रेस आपसातील भांडणात व्यस्त आहे तर भाजप वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे. शिवसेना उबाठा शिवाय कांग्रेस व भाजपचा महापौर चंद्रपूर मनपात विराजमान होऊ शकत नाही. महापौर बसविण्याच्या मार्गावर दोन्ही पक्षाला शिवसेना पक्षाला सोबत घेऊन चालावे लागेल तेव्हाच महापौर पदाचे कोडे सुटेल. पण त्यासाठी पहिली अडीच वर्षे महापौर पद शिवसेना पक्षाला द्यावे लागेल अशी अट शिवसेना पक्षाने पुढे ठेवली आहे. (शिवसेना ठाकरे पक्षाच्या अटीने कांग्रेस व भाजपची धाकधूक वाढली)
यावरून मोठी बातमी म्हणजे काही नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाल्याने नवे संकट उभे झाले आहे. ५ फेब्रुवारी पासून महापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज उचल व दाखल करणे सुरु होणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत नगरसेवकांना हात वर करून आपला पाठिंबा द्यायचा आहे, पण ते नगरसेवक प्रमाणपत्राशिवाय शक्य नाही. एकाच वेळी अनेक नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले कसे हे सुद्धा एक कोडे आहे.
सध्या प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळावी यासाठी अनेकांनी अर्ज केलेले आहे, मात्र अद्यापही नवे प्रमाणपत्र नगरसेवकांच्या हाती लागले नाही. कांग्रेसचे आपसातील भांडण संपुष्टात येत नसल्याने शिवसेना-वंचित गटाची साथ भाजपला मिळू शकते. निवडणुकीपूर्वी भाजप पक्षातील भांडणे मतदारांनी उघड बघितलेले आहे. आता निवडणुकीनंतर कांग्रेस पक्षाचे भांडण सुरु आहे, ज्यावर तोडगा निघण्याचे नाव नाही. त्यामुळे चंद्रपूर मनपात सत्ता स्थापन करण्याची संधी भाजप समोर चालून आली आहे. Chandrapur Mayor Election update
सत्ता स्थापनेसाठी भाजपने शिवसेना-वंचित गटासोबत चर्चा केलेली आहे, घोडं फक्त महापौर पदासाठी अडलं आहे. जर भाजपसोबत शिवसेना गेली तर भाजप महापौर ठरविताना मुनगंटीवार-जोरगेवार यांचा वाद पुन्हा उफाळू शकतो पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याची तयारी करून ठेवली असल्याची माहिती आहे. भाजप व कांग्रेसला सोबत येत सत्ता स्थापन करायची असेल तर मागील काळात चंद्रपूर मनपाच्या इतिहासात कांग्रेस व भाजपने एकत्र येत केलेली युती, शिवसेनेला सोबत न घेता वेगळा गट स्थापन करीत कांग्रेस भाजप एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे. कारण यापूर्वी अशी अभद्र युती चंद्रपूर मनपात झाली होती.
Leave a Comment