Krishna Mandir foundation : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४): चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून आणि नगरसेविका सौ. छबुताई वैरागडे यांच्या अथक परिश्रमातून जटपूरा प्रभाग क्रमांक ०७ मधील सराई वार्ड येथे यादव अहिर समाज कृष्ण मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले.
दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी हा शुभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांच्या शुभहस्ते मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले. (हे हि वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षातील बळीचा आकडा ४२ वर)
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र गुरनुले, माजी नगरसेवक ऍड. राहुल घोटेकर, भाजपा महामंत्री, महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. छबूताई वैरागडे, युवा मोर्चा सचिन प्रताप यादव, चेतन यादव, आमीत वैरागडे, अरुण वैरागडे, कपिल वैरागडे, अमजत भाई, प्रदीप यादव, बबलूजी यादव, हर्षदजी मटाले, अक्षय गुंडे, सागर नसरे यांचा समावेश होता. Krishna Mandir foundation
यासोबतच लता गुंडे, तृप्ति यादव, पदमिनी सदभयै, नीलम यादव, रश्मिताई बिलसे, श्वेता यादव, निलिमा खोखले, वंदना सदभयै, अमिता यादव, राजजी गुंडे, सतीशजी गुंडे, सुभाषजी चौहान, प्रलोक यादव, प्रताप यादव, संदीप सदभये, सोनाली गुंडे, रोशनी गुंडे, सारिका यादव आणि वार्डातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन समारंभानंतर मान्यवर पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगराचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक ऍड. राहुल घोटेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. उपस्थितांचे आभार श्री. चेतन यादव यांनी मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिर यादव समाजाच्या समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. या भूमिपूजनामुळे सराई वार्डात धार्मिक आणि सामाजिक एकजुटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Comment