minor gangrape case chandrapur : चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून त्याचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना ११ जुलै रोजी समोर आली. याप्रकरणी शेगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, तिघांना अटक केली आहे. स्वप्निल राजकुमार गुर्जेलवार (२३), गणेश राजेंद्र विश्रामकर (२४, दोघेही रा, समूद्रपूर, जि. वर्धा) व रोहन गजानन विश्रामकर (२४, रा. चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालात ईश्वरचिठ्ठीने विजय
शेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२५ रोजी पीडित अल्पवयीन मुलीला तिघांनी शेतशिवारात नेऊन बलात्कार केला. एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ तयार केला. शुक्रवारी हा व्हिडीओबाबत पीडित मुलीच्या वडिलांना माहिती मिळताच त्यांनी शेगाव पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. सदर अत्याचाराचा व्हिडीओ एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये आला होता, त्यांनतर हा झपाट्याने व्हायरल झाला. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी समयसूचकता दाखवली. legal action against minor rape accused
चंद्रपूर पोलिसांनी सदर अत्याचाराचा व्हिडीओ किंवा फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करू नये, पोलिसांना सहकार्य करा, जर व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी तिघांवर कलम ७० (२), १२३, भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ४, ६ पोक्सो कायदा, सहकलम ६६ (ई) ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करत आहेत.
या गंभीर प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे, याबाबत अद्याप प्रकरणाची सत्यता काय? हे कळू शकले नाही. जर हा व्हिडीओ बाहेर आला नसता तर गुन्हा दाखल झाला नसता. आरोपींनी २ महिन्यांनंतर व्हिडीओ समाजमाध्यमावर का टाकला? आरोपी पीडितेच्या ओळखीचे आहे काय? याबाबत अनेक प्रश्नांचे उत्तर पोलिसांच्या तपासात पुढे येणारचं.
17 Comments
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi