two-wheeler stolen Chandrapur arrest news । चंद्रपुरात आला रेकॉर्डवरील आरोपी आणि...

January 17, 2026 by Prakash Hande

two-wheeler stolen Chandrapur arrest news

two-wheeler stolen Chandrapur arrest news : चंद्रपूर - २ ऑगस्ट रोजी भिवापूर वॉर्ड चंद्रपूर मध्ये राहणारे ४६ वर्षीय शैलेंद्र किसनसिंह चौहान यांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत होंडा शाईन दुचाकी क्रमांक mh ४९ AC ५२९६ हि पार्क केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मोटार सायकल आपल्या जागेवर नव्हती. इतरत्र दुचाकींचा शोध घेतला मात्र ती कुठेही न आढळल्याने चौहान यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीची तक्रार दिली. motorcycle theft Bhiwapur ward

प्रियकराने इंस्टाग्रामवर शेअर केले खाजगी व्हिडीओ, पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, तपासादरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेतला असता यादरम्यान सदर दुचाकी वाहन हे कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर ज्योतिबा फुले चौकात राहणार रेकॉर्डवरील आरोपी २८ वर्षीय आरिफ कलंदर शेख ला पोलिसांनी अटक केली.

दुचाकी जप्त

आरोपी आरिफने भिवापूर वार्डातून चोरी गेलेली दुचाकी वाहन चोरी केले असल्याची कबुली दिली, पोलिसांनी आरोपी आरिफच्या ताब्यात असलेली दुचाकी वाहन जप्त केले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस कर्मचारी जावेद सिद्दीकी करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोउपनि विलास निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

Leave a Comment

+