Chandrapur Gambling Club Police Raid । मनोरंजनाच्या नावावर चालतो जुगार, चंद्रपूर पोलिसांनी केली कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur Gambling Club Police Raid

Chandrapur Gambling Club Police Raid : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अनेक मनोरंजन क्लब सुरु झाले आहे, या क्लब मध्ये मनोरंजनाच्या नावावर जुगार खेळल्या जात आहे. ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक व उप पोलीस स्टेशन लाठी मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोडसा येथील सार्वजनिक ठिकाण मनोरंजन क्लब मध्ये धाडसत्र कारवाई केली.

पेव्हर्स चोरी प्रकरणात पालिकेची कारवाई

राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी द्वारा चालविण्यात येणाऱ्या मनोरंजन क्लब मध्ये जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे मनोरंजन क्लब मध्ये पोलिसांनी कारवाई केली असता त्या क्लब मध्ये ताश पत्ते, कॉइन सह डीव्हीआर रजिस्टर सहित ३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Gambling Club

मनोरंजन नव्हे तर जुगार क्लब

मनोरंजन क्लब चे चालक महेश्वर गोपाल नायक अजमेरा राहणार चिंताकुंडा, तालुका शिरपूर जिल्हा आसिफाबाद याने संयोजक सोबत संगनमत करीत परवाना अटींचे उल्लंघन करीत मनोरंजनाच्या नावाखाली जुगार सुरु केला. पोलीस स्टेशन लाठी येथे चालक, संयोजक व जुगार खेळणारे सदस्य सह अपप्रेरणा देणारे आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले कि अश्या प्रकारच्या कोणत्याही क्लब मध्ये जुगार सुरु असल्यास त्वरित जवळचे पोलीस स्टेशन, किंवा पोलीस नियंत्रण कक्ष मधील ११२ वर संपर्क करीत माहिती द्यावी.

Leave a Comment

+