Party Ticket Dispute : चंद्रपूर १ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप व कांग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर मोठा गोंधळ उडाला, भाजपने स्थानिक पातळीवर अधिकृत यादीत बदल केला तर कांग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते व विद्यमान नगरसेवकांना संधी न देता ज्यांचे राजकीय अस्तित्व नसताना पक्षाचे तिकीट दिल्याचा आरोप कांग्रेस पदाधिकारी यांनी केला आहे. (जटपुरा प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली)
कांग्रेस पक्षातील माजी नगरसेवक नंदू नागरकर, प्रशांत दानव, सुनीता लोढिया, विना खनके, शकीना अन्सारी, सागर खोब्रागडे, बापू अन्सारी, उमाकांत धांडे यांना उमेदवारी नाकारत उपऱ्यांना कांग्रेस पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. राहुल घोटेकर यांना एकोरी प्रभागातून उमेदवारी देण्यात आली विशेष म्हणजे ते त्या स्थानिक प्रभागातील रहिवासी नाही. नगिनाबाग प्रभागात तीच परिस्थिती आमदार अडबाले यांच्या नातेवाईकाला तिकीट, स्वप्नील कांबळे व दिक्षा सातपुते आणि घोटेकर यांनी काल परवा भाजपमधून कांग्रेस पक्षात आले आणि निष्ठावंतांना डावलून उमेदवारी घेऊन गेले.
खासदार धानोरकर यांचे स्वीय सहायक प्रफुल पुलगमकर यांच्या पत्नीला उमेदवारी, कांग्रेस पक्षाने सक्रिय नसलेले व दुसऱ्या पक्षातील सदस्यांना तिकीट दिले मात्र कांग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांना संधी दिली नाही, यामागील कटकारस्थान हे सोहेल शेख व स्वतः खासदार धानोरकर यांनी रचला असल्याचा आरोप कांग्रेस पक्षाचे व्हीजेएनटी सेल चे प्रदेश संघटक अवधूत कोटेवार यांनी केला आहे. जेव्हा कांग्रेस कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचे नव्हते तर उमेदवारांच्या मुलाखती कशाला घेतल्या? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. विशेष बाब म्हणजे कांग्रेस पक्षाने वर्ष २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३ ते ४ नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. Party Ticket Dispute
भाजप पक्षात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महानगर अध्यक्षांना अधिकृत उमेदवारांची यादी पाठवली होती, मात्र सुभाष कासनगोट्टूवार यांनी स्थानिक पातळीवर त्यामध्ये मोठे बदल केले. शास्त्रीनगर प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून सुनील डोंगरे यांचे नाव जाहीर झाले मात्र दुसऱ्या यादीतुन त्यांचे नाव वगळण्यात आले. एमईएल प्रभागातून पूजा पोतराजे यांना उमेदवारी मिळाली मात्र त्यामध्ये खोडतोड करीत दुसऱ्याला उमेदवारी जाहीर करीत AB फॉर्म देण्यात आला.
सदर बाब इच्छुक उमेदवारांना कळल्यावर मोठा गोंधळ उडाला, पक्षाला सदर बाब समजताच भाजपने तात्काळ महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची पदावरून हकालपट्टी केली. उमेदवारी एकाला तर एबी फॉर्म दुसऱ्याला असा प्रकार चंद्रपूर भाजपात घडला. इच्छुक उमेदवारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र महानगर अध्यक्षाची हकालपट्टी झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केला.
चंद्रपूर भाजपात मुनगंटीवार-जोरगेवार वादामुळे पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती, दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी याकरिता उहापोह केला होता, दोघांच्या वादात कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले असे चित्र प्रथमच भाजप पक्षात बघायला मिळाले.
Leave a Comment