tenant beaten by landlord : ब्रह्मपुरी - रूम खाली करण्याचा तगादा लावत घर मालकाने भाडेकरूला मारहाण केल्याचा प्रकार गुजरी वार्ड ब्रह्मपुरी मध्ये घडला. या प्रकरणात घर मालकाच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३८ वर्षीय सचिन बांबोळे असे भाडेकरूचे नाव आहे. बांबोळे हे १५ एप्रिल पासून वंदना भैसारे यांच्या घरी भाड्याने राहतात, मात्र रूम खाली करण्यासाठी घरमालक वंदना भैसारे यांनी वीज व पाण्याचे पैसे वाढवून मागत होते, मात्र ठरल्याप्रमाणे बांबोळे हे किराया देत होते, पैसे वाढवा अन्यथा रूम खाली करा असा तगादा घर मालकाने लावला. police case against house owner
बांबोळे हे घर मालकाच्या त्रासाला कंटाळून १४ जुलै रोजी त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. व लवकर मी दुसरी रूम शोधतो असे सांगितले. बांबोळे यांनी दुसऱ्या ठिकाणी रूम चा शोध घेतला मात्र त्यांना रूम मिळाली नाही.
३१ जुलै रोजी सचिन बांबोळे यांनी रूम खाली करतो असे सांगितले होते मात्र त्यांना दुसरीकडे रूम मिळाली नाही, १ ऑगस्ट रोजी बांबोळे हे रूमवर असताना घर मालकीण वंदना भैसारे, त्यांची मुलगी प्रीती भैसारे व त्यांचे नातेवाईक सह इतर ८ ते ९ तरुणांनी बांबोळे सोबत रूम का खाली केली नाही म्हणून भांडण सुरु केले. काही वेळातच उपस्थित तरुणांनी खिडकीच्या काचा तोडत बांबोळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली.

मारहाणीनंतर सचिन बांबोळे यांनी याबाबत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिसांनी प्रीती मोहन भैसारे यांचेवर कलम ११५ (२), १८९ (२), १९१ (२), ३३३ व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
Leave a Comment