motor pump theft : वरोरा - शेतातील मोटारपंप चोरी करणाऱ्या दोन आरोपीना वरोरा पोलिसांनी अटक केली आहे, सदरील आरोपी हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील निवासी आहे. (मुलीला वशीकरण करण्याचं गुपित,आणि २२ वर्षीय युवकाची हत्या)
२३ जानेवारीला रितिक संजय थेरे राहणार एकार्जुना यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये २ मोटारपंप व केबल असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची तक्रार दिली, थेरे व त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याची सुद्धा मोटारपंप चोरीला गेली होती.
गुन्हा दाखल झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी व गोपनीय माहितीद्वारे वरोरा पोलिसांनी सखोल तपास करीत मोटारपंप चोर सीताराम आसाराम भिसे व सुनील रामप्रसाद साळुंखे राहणार दोन्ही गोकुळनगर वणी जिल्हा यवतमाळ यांना अटक केली. आरोपीजवळून चोरी गेलेला मुद्देमाप जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, दिलीप सूर, संदीप मुळे, महेश गावतुरे व सौरभ कुलथे यांनी केली.
Leave a Comment