एमईएल प्रभागात तरुण नेतृत्वाची हवा; विक्रांत सहारे चर्चेत

January 17, 2026 by Prakash Hande

voter support trends : चंद्रपूर १४ जानेवारी - चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या प्रचारतोफा १३ जानेवारी रोजी थंडावल्या, मागील १२ दिवसात प्रत्येक उमेदवारांनी आपली शक्ती प्रचारात झोकून दिली होती, १७ प्रभागात नागरिकांना एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहे, यासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४५१ उमेदवार उभे आहे. ४५० उमेदवार सोडले तर एका उमेदवाराने प्रचाराने मतदारांना आपलं करीत शक्तिप्रदर्शन केलं, त्या उमेदवाराची चर्चा प्रभागात सुरु झाली आहे. (जटपुरा प्रभागातील निकाल धक्कादायक असणार)

एमईएल प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ गटात उभे असलेले युवासेना जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार विक्रांत सहारे हे आपलं नशीब आजमावत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तब्बल २ हजार नागरिकांनी सहारे यांच्या समर्थनात प्रचार रॅली काढली. प्रभागातील समस्यांची जाणं असलेला तरुण उमेदवार विक्रांत सहारे यांच्या प्रचाराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. voter support trends

चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नव्या विचारणा मतदारांनी संधी द्यावी अशी मागणी नागरिकांची आहे, मतदार जुने चेहरे पाहून कंटाळली आहे, एमईएल प्रभागातील अ गटात विजयासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे, नवीन पिढी राजकारणात आल्याने मतदारांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे, अनुसूचित जाती गटात नशीब आजमविणारे विक्रांत सहारे यांच्या पाठीमागे मतदारांनी भरघोस पाठिंबा दिला आहे, १५ जानेवारी ला मतदान असून दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदार नव्या पिढीला किती साथ देणार हे निकालावरून स्पष्ट होणार.

Leave a Comment

+