Aman Andhewar ESIC hospital demand । कामगार वाचवायचे असतील तर ...मनसेचे अमन अंधेवार यांची काय आहे मागणी बघा?

January 17, 2026 by Prakash Hande

Aman Andhewar ESIC hospital demand

औद्योगिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात हजारो कामगार विविध कारखान्यांमध्ये कार्यरत असून, अपघाताच्या घटना वारंवार घडत असतानाही कामगारांसाठी स्वतंत्र व तात्काळ उपचारासाठी आवश्यक असणारे ESIC रुग्णालय उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर कामगारांचे जीव वाचावेत यासाठी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यात ESIC रुग्णालय सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Aman Andhewar ESIC hospital demand : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातं असतांना व लाखों कामगार या उद्योगात कार्यरत असतांना कामगारांना योग्य व तात्काळ आरोग्य सुविधा जिल्ह्यात मिळत नाही त्यामुळे उपाचाराअभावी कित्तेकांचा जीव जातो म्हणून आपल्या चंद्रपूर मध्ये एक इ.एस.आय.सी रुग्णालय सुरु करा अशी मागणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ESIC hospital demand Chandrapur

जिवती तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचा झंझावाती दौरा

जिल्ह्याच्या कंपन्या मध्ये ज्या दुर्घटना घडतात व कामगारांना गंभीर जखमा झाल्यास चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये कामगारांना भरती करून नंतर खाजगी रुग्णालयात नेतात व नंतर नागपूरला हलवले जाते त्या दरम्यान बहुतांश कामगारांचा मृत्यू होतो, परंतु जर चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय जर खोलण्यात आले तर कामगारांचे नुकसान होणार नाही व वेळेवर उपचार करण्यात आला तर कांमागारांचे जीव वाचतील त्यामुळं कामगारांच्या हक्काचे रुग्णालय हे चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय स्थापन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.

Leave a Comment

+