वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी; चंद्रपूर जिल्ह्यातील 'बळी'चा आकडा ४२ वर

January 17, 2026 by Prakash Hande

tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे हि वाचा - चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

 

🔍 शोधानंतर लागला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव झाडे हे सोमवारी (दि. ८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.

 

शोध मोहिमेदरम्यान, शंकरपूर आणि कवडशीला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी (महावितरण) कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमा आणि परिसरातील परिस्थितीवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. tiger attack fatalities

 

📈 मानव-वन्यजीव संघर्षाचा वाढता धोका

शेषराव झाडे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळींचा आकडा पुन्हा वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव (विशेषतः वाघ) असलेली संवेदनशील जागा आहे. tiger attack fatalities

 

आजवर जिल्ह्यात झालेल्या या संघर्षामध्ये एकूण ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत, ज्यांची संख्या ३८ आहे. याव्यतिरिक्त, बिबट्याच्या हल्ल्यात २ तर अस्वल आणि हत्ती यांच्या हल्ल्यात प्रत्येकी अशा एकूण ४२ नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याने आणि शेतकरी व मजूर शेतीच्या कामासाठी जंगलात जात असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

+