Belora village rehabilitation | बेलोरा गाव पुनर्वसन प्रश्न चिघळला; खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक

January 17, 2026 by Prakash Hande

Belora village rehabilitation

Belora village rehabilitation : चंद्रपूर १६ सप्टेंबर २०२५ : टाकळी -जेणा- बेलोरा कोळसा खाण क्षेत्रातील बेलोरा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता चांगलाच चिघळला आहे. किमान ८० ते १०० एकर जमिनीची विक्री कंपनीने करून दिल्याशिवाय ग्रामदैवत भंगाराम मंदिराला हटवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशासनाला तातडीने निर्देश दिले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने N.A. जमिनीसाठी दुप्पट मोबदला आणि घर व पुनर्वसनासाठी २४ ऐवजी २६ लाख रुपये मोबदला देण्याचे निश्चित झाले आहे. यात आता २ लाख रुपयाची वाढ करण्यात आली आहे. मागील बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जमिनीच्या मोबदला २३ वरून २५ लक्ष रुपये मिळवून दिला होता. 

८३ लाखांचा टेंडर घोटाळा

आधी करारनामा मग जमीन

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ०६/०९/२०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून बेलोरा गावातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार धानोरकर स्वतः उपस्थित होत्या आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा केला. गावात घर असलेल्या परंतु लीजबाहेर जमीन असलेल्या व्यक्तींचीही जमीन संपादित करण्याची मागणी त्यांनी मांडली. याचवेळी, कंपनीने बंद केलेला गावातील ग्रामदैवत भंगाराम मंदिराचा रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. जोपर्यंत योग्य करारनामा होत नाही, तोपर्यंत गावकरी घरे व जमिनी देण्यास इच्छुक नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. MP Pratibha Dhanorkar intervention Belora

या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गावातील नागरिकांच्या पुनर्वसनासोबतच पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक गरजा आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर चर्चा केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. या बैठकीला आमदार करण देवतळे, पोलीस अधीक्षक मुमुक्फा सुदर्शन, उपजिल्हाधिकारी जताळे यांच्यासह आरो इन्फ्रा रियालिटी प्रा. कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमुळे बेलोरा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

+