shopkeeper murder over cigarette debt । उधारीचे पैसे मागितले म्हणून…थेट खून, राजुरा पोलिसांची जबरदस्त कामगिरी

January 17, 2026 by Prakash Hande

shopkeeper murder over cigarette debt

shopkeeper murder over cigarette debt - राजुरा - १५ जून रोजी राजुरा शहरातील रमाबाई नगरात ५३ वर्षीय महिलेच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं होत, रात्री कुणीतरी अज्ञाताने रायपुरे यांच्या घरी प्रवेश करीत धारदार शस्त्राने कविता रायपुरे या महिलेची हत्या करण्यात आली होती. सदर आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करीत राजुरा पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला असून सिगारेट चे पैसे कधी देणार याबाबत त्याला दोनदा हटकले म्हणून हा गुन्हा घडला. असल्याची बाब अल्पवयीन मुलाने कबूल केली.

चंद्रपूर आम आदमी पार्टीने केला मोठा गौप्य्स्फोट

१५ जुन रोजी सकाळी कविता रायपुरे यांची मुलगी दुधाचे पॉकेट घेण्याकरिता आई कविता रायपुरे यांच्या घरी गेली होती, आईला आवाज दिल्यावर सुद्धा काही प्रतिसाद न आल्याने आत बघितले असता कविता या मृत अवस्थेत पडल्या होत्या, पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानन्तर त्यांनी घटनास्थळ गाठले. कविता यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या.

पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम १०३ (१), ३३२ (ब) अन्व्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार होती, राजुरा पोलिसांनी कसलीही तमा न बाळगता रात्र - दिवस मेहनत घेतली, १५ ते २० ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, संशयाच्या आधारावर एकूण ४० संशयित इसमाची कसून तपासणी केली मात्र आरोपीचा सुगावा लागला नाही. crime due to cigarette addiction among teens

४० संशयित हे मृतक महिलेच्या घराजवळील व्यक्ती असल्याची माहिती आहे, गुन्हा घडल्यापासून एक मुलगा गावाबाहेर गेला असल्याची बाब पोलिसांना यावेळी मिळाली, त्याला फोन करीत बोलावले, त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला अशी कबुली दिली.

कारण काय?

मृतक कविता रायपुरे ह्या घरी किराणा दुकान चालवायच्या, परिसरातील नागरिक किराणा सामान रायपुरे यांच्या दुकानातून खरेदी करीत होते, अश्यावेळी अल्पवयीन मुलाला सिगारेट चा छंद होता, तो नेहमी सिगारेट घेण्यासाठी रायपुरे यांच्या दुकानात जायचा, उधारी जास्त झाल्याने रायपुरे यांनी त्या मुलाला पैश्यासाठी दोनदा हटकले, पैश्यासाठी का हटकले याचा राग त्या मुलाच्या मनात निर्माण झाला. आणि या रंगाचे रूपांतर महिलेच्या हत्येत झाले. कविता रायपुरे यांचा काटा काढायचा असा विचार मनात ठेवत त्या मुलाने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले, घटनेच्या दिवशी ती महिला एकटी आहे असे त्या मुलाला समजले, मध्यरात्री रायपुरे यांच्या घरी प्रवेश करीत त्याने कोयत्याने रायपुरे यांच्यावर वार केला. shopkeeper murder over cigarette debt

https://youtu.be/qeug68ldQF4?si=dpa_L32XqSloier-

या हल्ल्यात कविता रायपुरे यांचा जागीच मृत्यू झाला, पोलीस आपल्याला अटक करेल या भीतीने त्या मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला. त्याला बोलाविले असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र राजुरा पोलिसांच्या या आव्हानात्मक तपासाने सदर गुन्ह्याचा उलगडा झाला, अल्पवयीन मुलाला विश्वासात घेत त्याची सखोल चौकशी केली आणि त्याने गुन्हा कबुल केला, गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी त्या मुलाकडून जप्त केला.

सदर प्रकरणाचा यशस्वी तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि निशा भुते, सपोनि हेमंत पवार, पोउपनि पांडुरंग हाके, पोउपनि भीष्मराज सोरते, पोउपनि चाटे, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, शफिक शेख, शरद राठोड, अविनाश बांबोळे व आनंद मोरे यांनी केला.

Leave a Comment

+