Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest । बोधगया आमचा आहे! चंद्रपूरच्या रस्त्यावर गगनभेदी घोषणा

January 17, 2026 by Prakash Hande

Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest

Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest : बिहार मधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळांच्या सहकार्याने, न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.

आपल्या परिसरात अनधिकृत बालगृह आहे काय? तात्काळ करा तक्रार

रखरखत्या उन्हात नागरिक या शांतता मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते, आम्हाला आमचे पवित्र स्थळ परत करा अश्या घोषणा या शांतता मोर्च्यात करण्यात आल्या.

बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे. त्या वेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. लहान-मोठे आंदोलनही झाले. बुद्धगया महाविहार हिंदू च्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत बौद्धांना संघर्ष करावा लागेल. भंते सुरई ससाई यांनी बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी 9 टप्प्यांत आंदोलन केले. आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे. या मुद्द्याबाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात, जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत. bodhgaya temple controversy

https://youtu.be/BkSL-094pHA?si=4itnBEkdv4YHqCvb

हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 चा बीटी कायदा रद्द करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने चंद्रपूर जिल्हा पवित्र झाला आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर, भिक्खू संघ आणि बौद्ध लोकांच्या उपस्थितीत बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी एक नवीन मुक्ती चळवळ सुरू करण्यात आली आहे. बौद्धांच्या अस्मिते च्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी झाले.

Leave a Comment

+