महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये ‘पळवापळवी’! वडेट्टीवार–धानोरकर संघर्ष चव्हाट्यावर

January 29, 2026 by Prakash Hande

Congress Leader Conflict : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचा वाद आता विकोपाला गेला आहे, समृद्धी महामार्गावर कांग्रेसच्या नगरसेवकांना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार वर्धा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील सत्य हे वेगळेचं आहे. (10 फेब्रुवारीला ठरणार चंद्रपूरचा महापौर)

महापौर कुणाचा व्हावा सुरू असलेला हा वाद विरोधी पक्षातील नसून कांग्रेस पक्षातला आहे. चंद्रपूर मनपाच्या 66 जागेपैकी कांग्रेसचे 27 नगरसेवक, भाजप 24, शिवसेना-वंचित 8, अपक्ष 5, बसपा 1, एआयएमआयएम चा 1 निवडून आला आहे. बहुमताच्या काठावर असलेल्या कांग्रेस पक्षात महापौर कुणाचा यावरून वाद सुरू झाला. कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महापौर माझ्या गटातील व्हावा यासाठी तगादा लावला तर दुसरीकडे खासदार धानोरकर यांनी सुद्धा महापौर मी ठरविणार कारण हे माझं लोकसभा क्षेत्र आहे. 

आपसातील वाद वाढू नये याकरिता प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मध्यस्ती केली. दुसऱ्या दिवशी धानोरकर यांनी कांग्रेस नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. यावर वडेट्टीवार गटाने आक्षेप घेतला, पुन्हा प्रदेशअध्यक्षाला मध्यस्ती करावी लागली. झूम मिटिंग द्वारे दोन्ही नेत्यांची समजूत काढली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मी पक्षाकरिता दोन पाऊले मागे घेत असून चंद्रपूरचा महापौर खासदार धानोरकर ठरवतील तर माझ्याकडे स्थायी समिती सभापती निवडण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे दिली. मात्र दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार गटाकडून धानोरकर यांचे 5 नगरसेवक पळविण्यात आले.Congress Leader Conflict

नेत्याने शब्द फिरविला आणि पळवापळवी सुरू झाली.

29 जानेवारीला समृद्धी महामार्गावर वडेट्टीवार गटातील नगरसेवक पुण्यावरून चंद्रपूरला येत होते, धानोरकर गटातील 5 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक त्या ट्रॅव्हल्स मध्ये आहे अशी माहिती मिळाल्यावर काही युवकांनी सदर वाहन थांबविले व 3 नगरसेवकसोबत खासदार धानोरकर यांचे बोलणे करायचे असल्याने सौरभ ठोंबरे त्या नगरसेवकांकडे गेले मात्र नगरसेवक अडुर यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर ठोंबरे वाहनांच्या खाली उतरले, यावर बराच वेळ वाद सुरू होता. 

काही वेळाने वरिष्ठ नेत्यांनी त्या वाहनात असलेल्या एकासोबत संभाषण करीत सर्व बाजु समजावली व प्रकरण शांत केले मात्र काही वेळाने घडलेल्या प्रकारची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली.

तक्रारीत काय?

कांग्रेस नगरसेवक राजेश अडुर यांनी वर्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की सौरभ ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह आमचे वाहन थांबविले व वाहनातील काही नगरसेवकांना सोबत चालण्यास सांगितले, याचा विरोध केला असता हमारे साथ चलो नही तो मार डालेंगे असे म्हणत शिवीगाळ केली.

सौरभ ठोंबरे काय म्हणाला?

धानोरकर यांचे 5 नगरसेवक पळविण्यात आले होते, त्यापैकी 3 नगरसेवक त्या वाहनात असल्याची माहिती मिळाली, खासदार धानोरकर यांच्यासोबत त्यांचे फोन द्वारे बोलणे करून द्यायचे असल्याने मी वाहन थांबवित त्यांचे बोलणे करून देणार असताना राजेश अडुर यांनीच मला शिवीगाळ करणे सुरू केले. आम्ही त्यांना कसलीही जोर-जबरदस्ती केली नाही.

चंद्रपुरात महापौर पदावरून सुरू झालेला कांग्रेसचा आपसातील संघर्ष आता कोणत्या थराला जाणार याचा काही नेम नाही, कांग्रेसच्या संघर्षावर आता नागरिक सुद्धा आपली बोलकी प्रतिक्रिया देऊ लागले आहे, कांग्रेसची गटबाजी ही पक्षासाठी घातक आहे, यामुळे जनता त्यांना निवडून देत नाही. कांग्रेसच्या भांडणाचा फायदा भाजपला होणार हे तितकेच खरे आहे.

Leave a Comment

+