Online cricket betting in India । "चंद्रपूरात सट्टेबाजांचा बॉक्स – पोलिसांना मिळणार का मुख्य सूत्रधार?"

January 17, 2026 by Prakash Hande

Online cricket betting in India

"ऑनलाइन जुगाराने तरुणाई बरबाद – चंद्रपूरात कोट्यवधींचा खेळ कोण खेळतंय?"

Online cricket betting in India : देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी पण लोकप्रियता क्रिकेटच्या खेळाची आहे, या क्रिकेटने तरुणाईला जुगाराचे वेड लावले. जुगार काही साधा नाही, हा ऑनलाईन जुगार आहे. आयडी पासवर्ड घ्या आणि लावा पैसे. क्रिकेट जुगाराचे संपूर्ण नेटवर्कचे केंद्रबिंदू हे नागपूर आहे. संत्रा नगरीतून इतरत्र धंदा सुरु करायचा असल्यास त्यासाठी नागपूरला जावे लागते. २२ मार्चपासून देशात आयपीएल च्या पर्वाला सुरुवात होत आहे. क्रिकेटप्रेमी या हंगामाची वाट बघत असून क्रिकेट सट्टेबाज यांनी सुद्धा आपल्या परीने याबाबत तयारी केली आहे.

आजपासून संघटित गुन्हेगारीचा महासंग्राम सुरु होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण या T२० क्रिकेटवर हजारो कोटी रुपयांचा सट्टा लावला जातो, या सट्ट्याचं केंद्रबिंदू विदर्भातील नागपूर आहे. नागपुरातून या जुगाराची सूत्रे हलविण्यात येते.

चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस दलात काही फेरबदल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई केली मात्र अजूनही ठोस कारवाई करण्यात आली नाही. पहिल्या कारवाईत ३ आरोपी आणि दुसऱ्या कारवाईत १ पहिल्या गुन्ह्यातील आरोपी हे पोहचलेले सट्टेबाज आहे. मात्र पोलीस विभाग अजूनही ह्या जुगाराचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचू शकले नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे सट्टेबाज?

महेश-राजिक, रामनगर येथील नीरज, राकेश-अविनाश, प्रदीप हे या जुगारात मुख्य केंद्रबिंदू, यांच्या मार्फत हा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यात फोफावला आहे.

अशी होते आयडी तयार..

कुणाला जुगार खेळायचा असल्यास वरील जुगाराना कॉल करीत आयडी तयार करावी लागते, आयडी २ हजार ते १ लाख रुप्यापर्यंत असते, आयडी बनल्यावर त्याचं पेमेंट ऑनलाईन किंवा कॅश पद्धतीने करण्यात येते. काही कमिशन कट झाल्यावर आयडी धारकांच्या खात्यात डिजिटल कॉइन जमा करण्यात येतात. १ बॉल, १ ओव्हर, रन, अर्धशतक, शतक व विकेट यावर हजारो लाखों रुपये बेट लावत क्रिकेट प्रेमी घरी बसून आस्वाद घेतात. आयडी धारक सट्टा हरत असेल तर त्याला आयडी रिचार्ज करण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतात. How to start cricket betting online

आयडी चा तपशील काय?

स्थानिक गुन्हे शाखेने व्यंकटेश हॉटेल मध्ये मारलेल्या धाडीत ३८ बँक खाते फ्रिज केले त्यामध्ये तब्बल ६० लक्ष रुपये असल्याची माहिती होती. त्यावेळी nice ७७७७ व इतर आयडी मिळून आल्या मात्र आता Nice४५ ह्या आयडी ची धूम सट्टा बाजारात जोमात सुरु आहे. रामनगर येथील नीरज बुकी याच संपूर्ण काम बंटी नावाचा पंटर सांभाळतो. तर अविनाश, राकेश, प्रदीप, महेश आणि राजीक हे स्वतः व इतरांच्या माध्यमातून हि ऑनलाईन संघटित गुन्हेगारी चालवितात. Cricket betting ID cost

जिल्हा स्तरावर क्रिकेट जुगार सुरु करायचा झाल्यास त्याची सर्व योग्यरितीने अलिखित परवानगीने तयारी करावी लागते. जिल्ह्यात काम सुरु करणे म्हणजे बॉक्स घेणे, त्या बॉक्स मधून पंटरांना जोडणे. ग्राहकाला आयडी पासवर्ड दिला कि कॉईन च्या माध्यमातून जुगार खेळणे. कॉइन संपले तर ऑनलाईन पेमेंट करीत पुन्हा कॉइन घेणे. Chandrapur betting racket

क्रिकेट जुगार खेळताना ३ महारथी पोलिसांच्या ताब्यात

क्रिकेट जुगारामुळे चंद्रपुरात अनेकांचं आयुष्य बदलून गेले, म्हणजे हा व्यवसाय जो करतो तो करोडपती आणि जो पैसे लावून खेळतो तो रोडपती अशी साखळी अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात बेधडकपणे सुरु आहे. या जुगाराचे सोनेरी दिवस म्हणजे आयपीएल या मौसमात हजारो कोटींचा जुगार खेळला जातो.

पोलीस कारवाई होऊ नये यासाठी अर्थकारणाचा खेळ आधीच खेळल्या जातो, तसे चंद्रपुरात नावाजलेले नाव या व्यवसायात गुंतलेले आहे. ते कधी पोलिसांच्या हाती लागले नाही भविष्यात चांगला पोलीस अधिकारी आला कि त्यावेळी शक्यता आहे, मोठा मासा अडकण्याची. त्याला अजून खूप वेळ आहे.

महाकाली, भिवापूर, सिंधी कॉलोनी, बंगाली कॅम्प, विठ्ठल मंदिर वॉर्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स, जटपुरा गेट असे अनेक सुगीचे ठिकाण आहे जिथून हे नेटवर्क सुरु होते. सध्या हॉटेल्स मध्ये रूम घेऊन एसी च्या थंड हवेत हा जुगार खेळल्या जातो. एखादी बुकी पोलिसांच्या हाती लागला तरी त्याला सूचनापत्र देऊन जामिनावर सोडून दिल्या जाते. Illegal Betting Network

चंद्रपूर पोलिसांकडे सक्षम यंत्रणा असूनसुद्धा जुगारी त्यांच्या हाती लागत नाही हि कमालच म्हणावी लागेल. असो हा व्यवसाय सुरु केल्यावर आपल्याला काही समजलं नाहीतर थेट दुबई गाठत (Dubai Betting Training) नवीन एप बाबत आपल्याला प्रशिक्षण घ्यावे लागते. व्यावसायिकाचे दुबई मार्गक्रमण करीत जुगाराचा रोजगार अंगिकारावा लागतो.

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी कारवाई तर केली पण त्यामधील मूळ कोण आहे याबाबत त्यांनी शोध लावल्यास मोठे मासे त्यांच्या गळाला लागतील हे नक्कीच. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे सध्या पंटर लोकांनी अंदर बाहर, खिलाना बंद केले आहे. पोलिसांनी क्रिकेट सट्टा बहाद्दर यांच्या मुसक्या आवळण आता गरजेचे बनलं आहे.

Leave a Comment

+