mhada office property seizure by court : चंद्रपूर : चंद्रपूर येथील दिवाणी वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दाताळा येथील म्हाडा कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी शेतमालकांना दिल्या जाणाऱ्या वाढीव नुकसानभरपाईची रक्कम रू. २ कोटी ४३ लाख २९५ रुपये न भरल्यामुळे करण्यात आली.
कोसारा येथील भू.नं. १४४/१ या जमिनीचे संपादन म्हाडाने केल्यानंतर शेतमालक हरीदास लक्ष्मण पाऊनकर, सुभाष लक्ष्मण पाऊनकर व इतरांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांना वाढीव नुकसानभरपाई मंजूर केली. म्हाडाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले मात्र ते फेटाळण्यात आले. परिणामी, शेतमालकांच्या बाजूने निर्णय कायम राहिला.
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी
तरीही म्हाडाने रक्कम न भरल्याने न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयाचे बेलीफ दाताळा येथील म्हाडा कार्यालयात जाऊन टेबल, खुर्च्या, व कंप्युटर जप्त केले. ही मालमत्ता शेतमालकाच्या सुपुर्दनाम्यावर ठेवण्यात आली आहे. जर म्हाडाने लवकरात लवकर रक्कम भरली नाही, तर या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात शेतमालकांच्या वतीने अॅड. पुरुषोत्तम सातपूते यांनी प्रभावीपणे बाजू मांडत महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. court ordered auction of seized govt office property
हे प्रकरण संपादित संस्थांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थांवर कायद्याने कारवाई होणे ही लोकशाहीत एक सकारात्मक बाब आहे.
शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अतिशय कमी दिला होता. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश देहूनही मोबदला न दिल्यामुळे ही कारवाही करण्यात आली.
-अड पुरुषोत्तम सातपुते
चंद्रपूर
Leave a Comment