विदर्भातील शिक्षकांचा मेळावा 31 जानेवारी–1 फेब्रुवारी; संघर्षाची रणनिती ठरणार

January 30, 2026 by Prakash Hande

vidarbha teachers meeting : चंद्रपूर : राज्‍यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ज्‍वलंत विषयांवर चर्चा करून त्यावर प्रभावी उपाययोजना करता यावी म्हणून विदर्भस्तरीय शिक्षक मेळावा ३१ जानेवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी संतनगरी शेगाव (जि. बुलढाणा) येथील गणेश  प्रस्थ मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. (चंद्रपूर महापौर पदासाठी कांग्रेस पक्षाचा हायव्होल्टेज ड्रामा

या मेळाव्यामध्ये राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील आयटीआय निदेशकांच्या विविध समस्या, टीईटी संदर्भात शासनाचे धोरण व त्याबाबत शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम, राज्यातील आदिवासी आश्रम शाळामधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, टप्पा वाढ अनुदान, नक्षलग्रस्त, आदिवासी भागामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नती व वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा तसेच १५% नक्षलग्रस्त भत्ता सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात यावा, अंशतः अनुदानित शाळा तुकडीवर कार्यरत शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सवलत, अर्जित रजा रोखीकरण व शाळेला वेतनेत्तर अनुदान मंजूर करणे, याशिवाय शिक्षक कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली विविध देयके शालार्थ आयडी प्रकरणे, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती तसेच त्यांचे शालार्थ आयडी प्रकरणे, विनाअनुदानित तुकडी वरून अनुदानित अनुदानित तुकड्यावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे या व अशा अनेक समस्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

३१ जानेवारीला सायं. ५ वाजता कार्यकर्ता परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी आमदार सुधाकर अडबाले, उद्‌घाटक म्‍हणून माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, प्रमुख पाहुणे म्‍हणून प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, तर परिसंवादावर वक्‍ते म्‍हणून दिलीप कडू, जयदीप सोनखासकर, राजेश खडबडे, प्रमोद मुनेश्‍वर, रामदास खवशी मार्गदर्शन करणार आहेत.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी विदर्भस्तरीय शिक्षक मेळाव्‍याचे उद्‌घाटन तथा संघर्ष स्‍मरणिका प्रकाशन समारंभ सकाळी ११.३० वाजता होणार आहे.  
या शिक्षक मेळाव्याला उद्‌घाटक म्‍हणून आमदार धीरज लिंगाडे, अध्यक्षस्‍थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस तथा माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, मार्गदर्शक म्‍हणून विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, स्‍मरणिका प्रकाशन शुभहस्‍ते आमदार संजय खोडके, स्‍वागताध्यक्ष म्‍हणून माऊली ग्रृपचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील, प्रमुख पाहूणे म्‍हणून आमदार ॲड. अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, मेस्टाचे राज्याध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील, महा. राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे सल्लागार भोजराज काळे, महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस किसन पुंड, आदिवासी आश्रम शाळा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सरचिटणीस आशुतोष चौधरी व अमरावती शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू आदी मान्यवर उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. vidarbha teachers meeting

या मेळाव्यादरम्यान नागपूर विभागाचे शिक्षक आमदार तसेच संघटनेचे सरकार्यवाह श्री. सुधाकर अडबाले यांनी मागील तीन वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेले भरीव कार्य यावर 'संघर्ष' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

या शिक्षक मेळाव्यामध्ये दिग्गज शिक्षक आमदाराचे मौलिक मार्गदर्शन मिळणार असल्याने विदर्भातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे प्रांतिय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयदीप सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment

+