बाबुपेठ: वाढदिवसाला गेलेले कुटुंब, चोराने पिग्गी बॉक्स चोरले

May 01, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून रात्रीच्या सुमारास चोर बंद असलेल्या घरात डल्ला मारण्याचे काम करीत आहे, आता तर दिवसाही चोरी करण्याचा कार्यक्रम चोरांनी सुरु केला आहे. बाबुपेठ भागात कुकडे कुटुंब ३० एप्रिलरोजी दुपारी १ वाजता भावाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले असता सायंकाळी शेजाऱ्यांनी फोन द्वारे माहिती दिली कि तुमच्या घरातील दार उघडे आहे. कुकडे कुटुंब घरी आले आणि चोरी झाल्याचे त्यांना समजले, चोराला काही न मिळाल्याने त्याने मुलाची पिग्गी बॉक्स चोरून नेली. (चौकात गोंधळ आणि हातात खंजर, दोघांना अटक) 

 

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला असून फिर्यादीने या प्रकरणात आरोपीला पकडले आहे. ३० एप्रिल रोजी जय बजरंग चौक बाबुपेठ मध्ये राहणारे ४७ वर्षीय उमाकांत शंकर कुकडे हे आपल्या कुटुंबासह मूल मध्ये भावाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दुपारी १ वाजता गेले होते.

 

सायंकाळी ६.४९ वाजता शेजाऱ्यांनी कुकडे यांना तुमच्या घराचे दार उघडे आहे असे कॉल करून सांगितले, तात्काळ कुकडे घरी पोहोचले, घराचे दार उघडे होते, सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते, बेडरूम मधील अलमारीचा लॉक तोडून होता, चोराने आलमारी मध्ये कुकडे यांच्या मुलाचे २ पिग्गी बॉक्स नेले ज्यामध्ये १२ हजार रुपये होते.

Babupeth House Theft: CCTV फुटेजवरून आरोपीला स्वतः पकडले

घराच्या शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्याने कुकडे यांनी फुटेज बघितले असता चोर हा घराच्या गेटमधून आत आला, अज्ञात चोराचा चेहरा स्पष्ट दिसल्याने कुकडे यांनी स्वतः जुनोना चौक परिसरात जाऊन चोराचा शोध घेत त्याला पकडले, विशेष म्हणजे त्याने चोरी केल्याचे कबूलही केले.

 

याप्रकरणी उमाकांत कुकडे यांनी आरोपी राजेश दंडावार वर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. 

Leave a Comment

+