बल्लारपूर: रेल्वे चौकात खंजर घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले

May 01, 2026 by Prakash Hande

बल्लारपूर - कोम्बिंग ऑपरेशन करून परत येत असताना रेल्वे चौकात काही इसम हे नगरसेवक सातपुते यांच्याभोवती घोळका तयार करीत गोंधळ करीत असताना पोलीस त्याठिकाणी आले, पोलिसांची चाहूल लगतची काहींनी धूम ठोकली तर दोघे तिथेच होते, त्यांच्या हातात खंजर असल्याचे समजताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अवैध दारूचा धंदा, गुन्हे शाखेची धाड)

 

३० एप्रिलला रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन करून पोलीस परत जात होते, मात्र रेल्वे चौकात काहीतरी गोंधळ होत असल्याचे समजताच पोलीस पथक त्याठिकाणी धडकले, पोलिसांना बघताच काही पळ काढला तर २ इसम दुचाकीवर बसून होते, एका इसमाच्या हातात धारदार खंजर पोलिसांना दिसला.

Ballarpur Knife Arrest: 50,500 चा मुद्देमाल, हत्यार कायदा गुन्हा

 

परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ते इसम तिथे दिसून आले, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत, त्यांचे नाव ३१ वर्षीय शेख शाहरुख शेख बाबा व ३० वर्षीय उदय पालसिंग चंडालिया दोघे राहणार झांसी राणी चौक बल्लारपूर, त्यांच्याजवळून पोलिसांनी लोखंडी धारदार खंजर व एक दुचाकी वाहन असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांवर भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक उमेश दिगंबर जोगदंड, पोलीस कर्मचारी सचिन अल्लेवार, प्रवीण निकोडे, लखन चव्हाण व खंडेराव माने यांनी केली.      

Leave a Comment

+