Lost money recovered : नागभीड २८ डिसेंबर २०२५ - बस स्टॉप वरून घराकडे जात असताना एका व्यक्तीच्या खिश्यातुन तब्बल ५२ हजार ६०० रुपयांची रक्कम पडली, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर नागभीड पोलिसांनी तात्काळ तपास करीत सदर रक्कम एका इसमाला मिळाले होते पोलिसांनी ती रक्कम मूळ मालकाला परत केली.
२६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शाकीर शेख राहणार सुलेझरी हे मौजा सुलेझरी बस स्टॉप येथून घराकडे जात असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून रोख ५२ हजार ६०० रुपये रस्त्यावर पडले. घरी पोहोचल्यावर सदर रक्कम खिश्यात न मिळाल्याने रोख रक्कम हि रस्त्यावर कुठेतरी पडली असा संशय शेख याना आला त्यांनी वाटेत जाऊन बघितले मात्र त्यांना पैसे कुठेही आढळून आले नाही.
याबाबत शाकीर शेख यांनी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी याबाबत त्या परिसरात विचारपूस केली, रस्त्यावरील दुकानातील व टोल प्लाझा वरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका अनोळखी इसमाला ती रक्कम मिळाली असे दिसून आले. Nagbhid Police Station
पोलिसांनी त्या अनोळखी इसमाचा शोध घेत वाटेत पडलेल्या रकमेबाबत विचारपूस केली असता ती रक्कम त्या इसमाने पोलिसांच्या स्वाधीन केली. २७ डिसेंबर रोजी नागभीड पोलिसांनी शाकीर शेख ययांना पोलीस स्टेशनमध्ये सदर रक्कम परत केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोलीस कर्मचारी संजय मांढरे, दीपक कोडापे, जितेंद्र मारभते व शुभम बनकर यांनी केली. यावेळी नागभीड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले कि रस्त्यावरील दुकान व घरांना नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे जेणेकरून अश्या घटना घडल्यास तात्काळ नागरिकांची मदत करण्यास सोपे जाणार.
.
Leave a Comment