Chandrapur BJP pandal dispute : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ - मागील २३ वर्षात चंद्रपूरच्या राजकारणात जे घडलं नाही ते वर्ष २०२५ मध्ये घडणार आहे, या मागील कारण राजकीय पक्षातील उभी फूट आहे. ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी निमित्त राज्यसहित चंद्रपुरात गणेश मूर्ती विसर्जन सोहळा होतो, या सोहळ्यात गणेश भक्त व मंडळाचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष आपले भव्य पेंडाल उभारतात. चंद्रपुरात या आधी कांग्रेस पक्षाचे दोन पेंडाल असायचे मात्र यंदा भाजपचे २ पेंडाल असणार आहे ते सुद्धा आजूबाजूला.
भद्रावती कृषी बाजार समिती संचालकांचा भाजपात प्रवेश
पेंडाल वादाने चंद्रपूर शहर भाजपात आज मोठी खळबळ उडाली होती, चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार हे माजी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांना दिलेल्या पेंडाल ची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर मनपा कार्यालयात गेले होते. भाजप मागील २३ वर्षांपासून लोकमान्य टिळक हायस्कुल समोर गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी पेंडाल उभा करते. मात्र यंदा चंद्रपूर विधानसभेच्या भाजपची सूत्रे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे आल्याने भाजपचे नवे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आपल्यातर्फे मनपा कार्यालयात पेंडाल च्या जागेसाठी अर्ज केला मात्र त्या जागेची परवानगी राहुल पावडे भाजपचे माजी महानगर अध्यक्ष यांना दिली असल्याचे कळले, विशेष म्हणजे पावडे यांच्या नावाने दोन जागेची परवानगी होती. BJP infighting Chandrapur Ganesh pandal permissions
चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी यावर आक्षेप घेत सदर परवानगी अधिकृतपणे महानगर अध्यक्षांच्या पत्रावर आम्हाला मिळावी असे निवेदन मनपाला दिले. यावर काही काळ मनपामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. राहुल पावडे यांनी आपल्या नावावर दोन ठिकाणी पेंडाल परवानगीच्या नावाने अतिक्रमण केले सदर परवानगी रद्द केली नाही तर आम्ही सदर अतिक्रमण हटवू असा इशारा दिल्यावर एका जागेची परवानगी रद्द करण्यात आली. मात्र यामुळे प्रथमच भाजपचे दोन पेंडाल उभे राहणार असल्याने भाजपातील गटबाजी यानिमित्ताने पुन्हा पुढे आली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी दोन्ही स्वागत पेंडाल मध्ये भाजपचे आजी-माजी पदाधिकारी आमने सामने असणार आहे. Chandrapur pandal politics BJP factions clash
भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रतिक्रिया दिली कि भाजप हा एकसंघ पक्ष आहे मात्र राहुल पावडे भाजपात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याबाबत आम्ही प्रदेश भाजपला याबाबत माहिती देऊ. चंद्रपूर जिल्ह्याच्या भाजपच्या राजकारणात माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद हा जगजाहीर आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचा राजकीय प्रवास हा भाजपमधून सुरु झाला, मात्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती, विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांचा पराभव झाला मात्र त्यानंतर त्यांनी वर्ष २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवीत भाजप व कांग्रेस उमेदवाराला पराभवाची धूळ चारत निवडणूक जिंकले. Chandrapur BJP pandal dispute
वर्ष २०२४ मध्ये त्यांनी अनेक संघर्ष करीत सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजपात प्रवेश करीत निवडणूक जिंकली, मात्र दोघांचा वाद हा कायम राहिला. चंद्रपूर महानगर भाजप कार्यकारणीत आमदार जोरगेवार यांच्या समर्थकांची वर्णी लागल्याने मुनगंटीवार समर्थकांत असंतोष पसरला. त्यामुळे माजी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. आजही महानगर भाजपच्या कार्यक्रमात मुनगंटीवार समर्थक जात नाही. आजच्या पेंडाल वादात मुनगंटीवार व जोरगेवार समर्थक आमनेसामने आले होते. अनंतचतुर्दशी ला भाजपच्या स्वागत पेंडाल मध्ये नेमकं काय घडणार हे ६ सप्टेंबर रोजी पुढे समजेल.
Leave a Comment