चंद्रपुरात स्वतःच्याच नगरसेवकांच्या घरावर काँग्रेसने का लावली नोटीस?

February 02, 2026 by Prakash Hande

Chandrapur Congress Dispute : चंद्रपूर - महापौर व गटनेता पदावरून चंद्रपूर कांग्रेस पक्षात घमासान सुरू आहे, कांग्रेसचे नगरसेवक हे पक्षाचे नसून नेत्यांच्या गटात विभागले असल्याचे चित्र आहे. (वाचा - वीजबिल होणार झिरो, मुनगंटीवार यांचं गिफ्ट)

सत्तेच्या जवळ असताना आमदार वडेट्टीवार-खासदार धानोरकर यांच्यातील वाद हा पक्षाला सत्तेपासून दूर नेत आहे. यापूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कांग्रेस नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करीत गटनेतेपदावर सुरेंद्र अडबाले यांची निवड केली होती, मात्र त्यावर वडेट्टीवार गटाने आक्षेप घेतला, त्यानंतर पक्षातील नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली. आज कांग्रेस नेत्यांच्या गटात विभागली गेली आहे.

अश्यातच कांग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे.

गटाची नोंदणी व गटनेता आपल्याला निवडायचे आहे असे पत्र कांग्रेस नगरसेवक राजेश अडुर यांनी धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घराला लावले, 1 फेब्रुवारीला पक्षातील 27 नगरसेवकांनी बैठकीत उपस्थित रहावे, त्या बैठकीत गट नोंदणी व गटनेता पदावर निर्णय व्हावा असे नमूद आहे. मात्र सदर पत्र वैयक्तिक रित्या देण्यात आले नाही नगरसेवकांच्या घराच्या भिंतीला ते पत्र लावण्यात आले, म्हणजेच कांग्रेस नगरसेवक हे आपल्याच पक्षातील नगरसेवकांना वैयक्तिकरित्या भेटू शकत नाही. Chandrapur Congress Dispute

या पत्रानंतर धानोरकर गटातील नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून राजेश अडुर यांना बैठक बोलविण्याचा अधिकार कुणी दिला? पक्षाचे महानगर अध्यक्ष याबाबत ठरवतील, या विचित्र प्रकारानंतर कांग्रेस मधील काही नगरसेवक अडुर विरोधात पोलिसात तक्रार करणार आहे अशी माहिती आहे.

चंद्रपुरात नेत्यांच्या गटात कांग्रेस पूर्णतः विभागून गेली आहे, अश्यात जर पालिकेत कांग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाली तर काय होणार? याचा विचार न केलेला बरा.

Leave a Comment

+