Cyber security awareness : विसापूर, दि. [२ मार्च २५ ]: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई (SNDT Women's University) आणि वुमन्स डॉक्टर्स विंग, आयएमए चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनींसाठी "युथ फॉर डिजिटल लिटरेसी व सायबर सुरक्षा" या विषयावर राष्ट्रीय शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, विसापूर येथे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. Digital literacy
शिक्षकानेच पुरविली कॉपी, चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन (Police superintendent Chandrapur) आणि अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर हायजिन प्रॅक्टिशनर मुजावर अली यांनी विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा, ऑनलाईन सतर्कता आणि उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूरचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. राजेश इंगोले यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. वुमन्स डॉक्टर्स विंग, आयएमए चंद्रपूरच्या उपाध्यक्ष डॉ. पुनम नगराळे आणि सचिव डॉ. समृद्धी आईचवार यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. Cyber crime prevention
या कार्यक्रमात श्री उमेश आडे, समाज सेवा अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर आणि विद्यापीठातील शिक्षिकांसह 70 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी उत्तरे दिली.
Leave a Comment