पोंभुर्णा पोलिसांनी उधळला कत्तलीचा कट; २९ गोवंशांची सुटका.

February 01, 2026 by Prakash Hande

Pombhurna News Today : पोंभुर्णा - चंद्रपूर जिल्ह्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध पोलिसांचे कारवाई सत्र सुरु आहे, अशीच एक कारवाई ३१ जानेवारीला पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. या कारवाईत २९ गोवंशीय जनावरे सह एकूण ६ लक्ष ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (चंद्रपुरात गोवंशाची वाहतूक, गुन्हे शाखेचा छापा)

सपोनि राहुल ठेंगणे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, चेक ठाणा शेतशिवारात काही गोवंश जनावरे बांधून ठेवण्यात आले आहे, सादर जनावरे कत्तलीसाठी नेणार आहे, माहितीच्या आधारे पोलिसांनी शेत शिवारात धाड मारली, त्यावेळी २९ गोवंशीय जनावरांना उपाशी अवस्थेत, चारापाणी न देता निर्दयतेने बांधून ठेवलेल्या अवस्थेत होते.

पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करीत ८ पिकअप वाहनात त्यांना चंद्रपुरातील प्यार फाउंडेशनकडे सोपविण्यात आले. या प्रकरणी ४० वर्षीय उमाजी कालीवार पोंभुर्णा यांच्यावर व त्यांच्या फरार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहे.

सदरची क्रयशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात सपोनि राहुल ठेंगणे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी वासुदेव आत्राम, हरिन्द्रकुमार भारती, जगदीश पिपरे, अतुल मोरे व रजनीकांत यांनी केली.   

Leave a Comment

+