LCB police operation : चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धाडसी कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक रोखली आहे. या कारवाईत दोन वाहने आणि २४ बैल जप्त करण्यात आले असून एकूण ३० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. (चंद्रपुरात चोरांचा हैदोस, एकाच रात्री २ ठिकाणी घरफोड्या)
३० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला रामनगर हद्दीत गोवंशाची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आयशर वाहन (क्र. MH-34-BG-3768) अडवले. तपासणी केली असता, त्यात अत्यंत निर्दयतेने २४ गोवंश (बैल) कोंबलेले आढळले. या तस्करीला मदत करणाऱ्या आणि रस्ता मोकळा करून देणाऱ्या (पायलटिंग) एका बोलेरो निओ (क्र. CG-08-AU-9237) वाहनावरही पोलिसांनी झडप घातली.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेतले आहे: १. अफरोज मजीद बेग (वय ३५, रा. गडचांदूर) - आयशर चालक. २. शेख भोलू शेख नकीम (वय ४५, रा. नागपूर) - बोलेरो चालक.
तसेच, या गुन्ह्यात सहभागी असलेले अरबाज कुरेशी (रा. नागपूर) आणि इरफान शेख (रा. गडचांदूर) हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी या कारवाईत खालील वस्तू जप्त केल्या आहेत:
दोन वाहने (आयशर आणि बोलेरो निओ)
तीन मोबाईल फोन
२४ नग गोवंश (ज्यांची सुरक्षिततेसाठी 'प्यार फाउंडेशन', छोटा नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.)
एकूण किंमत: अंदाजे ₹३०,२५,०००/-
आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र. २१३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ (सुधारित २०१५) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. LCB police operation
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभाग चंद्रपूर पथकाने पार पाडली.
Leave a Comment