illegal tobacco supply chain in Chandrapur । चंद्रपुरात १२ लक्ष रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडला

January 17, 2026 by Prakash Hande

illegal tobacco supply chain in Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) - राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठी खेप शिंदेसनेच्या लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी वरोरा शहरात पकडली, नगरपरिषदेचे मतदान झाल्यावर तंबाखू माफिया पुन्हा सक्रिय झाला मात्र राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिबंधित तंबाखू वाहतूक एकूण मुद्देमाल १७ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा पकडत प्रशासनाच्या हवाली केल्याने माफियांचे चांगलेच धाबे दणाणले.

२ महिन्यापूर्वी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्याकडे महिलांनी सुगंधित तंबाखू विक्री वरोरा शहरात थांबवावी असे निवेदन दिले होते, मात्र निवडणुकीच्या काळात यावर कारवाई झाली नाही, निवडणूका संपताच जिवतोडे यांनी महिलांच्या निवेदनावर लक्ष देत ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एकार्जुना तालुका वरोरा येथे अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू वाहन क्रमांक MH३४ BG १००९ उभी होती, जिवतोडे यांनी आपल्या सहकाऱ्यासमक्ष वाहनांची झडती घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इगल हुक्का तंबाखू, शिशा, ईगल झेन, विमल, पान पराग पान मसाला असा एकूण १२ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. illegal tobacco supply chain in Chandrapur

गुन्हेगारी - मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक

याबाबत मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला याबाबत सूचित केले, वरोरा पोलीस पथक एकार्जुना मध्ये दाखल होते वाहन चालक ५२ वर्षीय मिथुन लहानू घोटेकर राहणार चंद्रपूर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सांगितले कि सदर माल हा वरोरा शहरातील अनिल बोधे यांच्याकडे पोहचविण्यात येत होता.

वरोरा पोलिसांनी वाहन चालक घोटेकर व बोधे यांच्यावर कलम १२३, २२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानदे २००६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच अनिल बोधे पसार झाले.

झोपलेल्या प्रशासनाला आली जाग

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध सुगंधित तंबाखू पकडल्यानंतर वरोरा पोलीस व अन्न व औषध प्रशासन खळबळून जागे झाले, ४ डिसेंबर रोजी वरोरा शहरात ठिकठिकाणी अनिल फुलचंद शर्मा यांनी साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू किंमत ६ लक्ष ४९ हजार १७० रुपये जप्त करण्यात आला.

चंद्रपूर जिल्हा तंबाखू माफियासांठी अत्यंत सेफ झोन आहे, चंद्रपुरात ठिकठिकाणी खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री होते मात्र यावर अन्न व औषध प्रशासन सह पोलीस विभाग डोळेझाक करीत असतात. महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची उलाढाल होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूचा व्यवसाय कोण करत? हे प्रशासनाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण प्रशासन यावर निद्रावस्थेत असल्याची भूमिका घेते.

Leave a Comment

+