MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) - घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, घुग्घुसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. टिळक नगर येथून निघालेल्या पदयात्रेचे आठवडी बाजार चौक येथ सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाच्या मुद्यावर आपण निवडणुकीला समोर जात असुन नगराध्यक्ष पदासह सर्व नगर सेवकांना निवडणुन देण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
राजकीय : भाजप उमेदवारावर महिलांचा संताप, भद्रावती नगरपरिषद निवडणूक
यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदावार शारदा उर्फ पूजा दुर्गम, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, निवडणूक प्रमूख प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, विवेक बोडे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, चिन्ना नलभोगा यांच्यासह ईतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.
सदर सभेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, घुग्घुस मध्ये आम्ही जात-पात, भेदाभेद किंवा खोट्या आश्वासनांवर नाही, तर ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक लढवत आहोत. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर घुग्घुसमध्ये अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, क्रीडा सुविधा ते नागरिकांच्या दैनंदिन गरजांपर्यंत विकासाचा वेग वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus

घुग्घुसचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आजच्या पदयात्रेत नागरिकांनी जो प्रेम आणि विश्वास व्यक्त केला, तोच आम्हाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व भाजपा उमेदवार सक्षम, प्रामाणिक आणि कार्यक्षम आहेत. या विकासाच्या बळावरच ते निश्चित विजयी होतील, असा ठाम विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. वेकोलिच्या तलावामुळे घुग्घुस शहरातील नाल्यांना पूर येतो त्यामुळे या तलावाचे खोलीकरण करण्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केला आहे.
येथील रुग्णालय लवकर पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. येथील अनेक विकासकामे मागील काही वर्षात आपण पुर्ण करु शकलो आहे. कॉंग्रेसकडे आज विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काही नाही. ते केवळ घुग्घूस वासियांची दिक्षाभुल करण्याचे काम करत त्यांच्या खोट्या प्रचाराला घुग्घुसवासी बळी पडणार नाही असे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या सभेला घुग्घुस वासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a Comment