Chandrapur Municipal Politics Update : चंद्रपूर : शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व वंचित बहुजन आघाडी पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख उपस्थितीत नागपूर आयुक्त कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – वंचित बहुजन आघाडी या संयुक्त गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेच्या गटनेता पदासाठी राहुल विरुटकर यांची एकमताने निवड करण्यात आली. नव्या गटाच्या स्थापनेमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणात महत्त्वाचा बदल घडणार असल्याची चर्चा यावेळी रंगली. (चंद्रपूर महापौर पदाचे ९ संभाव्य दावेदार)
या प्रसंगी नगरसेवक आकाश साखरकर, लहूजी मरस्कोल्हे, मनस्वी गिऱ्हे, श्रुतीत घटे, स्वेता लाडके, किरण कोतपल्लीवार, लता साव, या नगरसेवकांची उपस्थिती होती. संयुक्त गटाच्या माध्यमातून महापालिकेतील निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावून शहराच्या विकासकामांना गती देण्यात येईल, असा निर्धार जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद हे ओबीसी महिला राखीव झाले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र कांग्रेस पक्षाला सत्तेत बसायचे असेल तर शिवसेना उबाठा ला सोबत घ्यावे लागेल अन्यथा कांग्रेस पक्ष सत्तेत बसू शकत नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष हा चंद्रपूर शहरातील मनपाच्या राजकारणात किंगमेकर म्हणून पुढे आला आहे.
सध्याची पक्षीय बलाबल स्थिती
कांग्रेस - २७, भाजप २३, उबाठा - ६, वंचित आघाडी - २, जनविकास सेना ३, शिंदेसेना १, बसपा १, अपक्ष २, Aimim १, बहुमतासाठी ३४ ची गरज.
Leave a Comment