Shiv Sena UBT News : चंद्रपूर २ जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवार सायराबानो काजी यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला, आमच्या प्रभागात आता विकासाची मशाल मेटविणार असा निर्धार सायराबानो काजी यांनी केला. (चंद्रपुरात भाजप शिवसेनेला मोठा धक्का)
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक ७ जटपुरा प्रभागात कांग्रेस-भाजपच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने कडवे आव्हान निर्माण केले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कांग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्या सायराबानो काजी यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला.
मागील २५ वर्षांपासून कांग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या सायराबानो काजी यांनी दोनदा मनपा निवडणुकीत सहभाग घेतला, दोन्ही वेळ त्यांचा पराभव झाला असला तरीही त्यांनी २ हजारांपेक्षा मतदान घेतले होते. ५ वर्षे प्रभागात नागरिकांची सेवा केली व ८ वर्षांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत ऐनवेळी कांग्रेस पक्षाने सायराबानो यांना उमेदवारी दिली नाही.
त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदर सायराबानो काजी यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत कांग्रेसला मोठा धक्का दिला. पक्षात एकनिष्ठ असल्यावरही माझ्यावर अन्याय करण्यात आला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. Shiv Sena UBT News
२ जानेवारीला जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मधून सायराबानो काजी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, २५ वर्षे कांग्रेस पक्षात राहून सक्रियपणे काम केल्यावरही मला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे आता आपण शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवारांचा प्रचार करणार आहो.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत मी पक्षप्रवेश केला आता प्रभागातील चारही उमेद्वारांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एकत्र करीत जटपुरा प्रभागात विकासाची मशाल पेटविणार. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मनस्वी गिर्हे व नागरिकांची उपस्थिती होती.
Leave a Comment