Jijau Brigade Chandrapur convention | चंद्रपुरात जिजाऊ ब्रिगेडचे तीन दिवसीय महाअधिवेशन

January 17, 2026 by Prakash Hande

Jijau Brigade Chandrapur convention

Jijau Brigade Chandrapur convention : चंद्रपूर : महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीन दिवसीय महाअधिवेशनाचे आयोजन चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे. 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान होणारे हे अधिवेशन प्रियदर्शिनी सभागृहात आयोजित आहे.

Also Read : चंद्रपुरात गुन्हेगारांची पत्रकारिता, 4 पत्रकारांना अटक


या महाअधिवेशनाचे उद्घाटन 21 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता होणार असून, या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके राहणार आहेत. उद्घाटन प्रसिद्ध उद्योजिका मीनाताई वासाडे यांच्या हस्ते पार पडणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार घोगरे, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहकरे, चंद्रशेखर शिखरे, सीमाताई अडबाले, शुभांगीताई धोटे, किरण देरकर, अर्चना भोंगळे, वेदांती देवतळे, नलुताई चाफले, स्नेहल गायकवाड, डॉ. दीपशिखा राजुरकर, दीपक खामणकर यांची उपस्थिती राहणार आहे.


उद्घाटन सत्रानंतर रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. या अधिवेशनात 22 आणि 23 नोव्हेंबर या दोन दिवसात एकूण सात सत्र घेतले जाणार असून, या सातही सत्रात विविध विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या सत्राला प्रारंभ होणार असून, यात जिजाऊ ते सावित्रीमाई : स्त्रीशक्तीचा वैचारिक वारसा या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात ॲड. वैशाली डोळस प्रमुख वक्त्या आहेत. Jijau Brigade three day meet Chandrapur news

विविध विषयांवर होणार परिसंवाद

दुपारी बारा वाजता होणाऱ्या ओळख नव्या युगाची या परिसंवादात स्नेहाताई टोम्पे, डॉ. भारती मधवई मार्गदर्शन करतील. दुपारी दीड वाजता ग्रामीण व शहरी महिला आणि डिजिटल माध्यम साक्षरता या विषयावर परिसंवाद असून यात प्रा. डॉ. प्राजक्ता धोटे आणि दिव्य भोसले मार्गदर्शन करतील. दुपारी चार वाजता कुटुंब व्यवस्था : बदलते विवाह समारंभ आणि स्त्रियांची भूमिका या परिसंवादात प्रा. डॉ. शिल्पा आठवले आणि डॉ. अलका ठाकरे यांचे मार्गदर्शन राहणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार आयोजित आहे. सत्कार सोहळ्यानंतर जिजाऊ ब्रिगेडने आम्हाला काय दिले, यावर अनुभव कथन होणार आहे.


23 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता सहाव्या सत्रातील पहिल्या परिसंवादाला प्रारंभ होईल. महिलांचे भावविश्व व विचारविश्व : आकलन, आव्हाने व अपेक्षित बदल या विषयावर जेएनयूचे प्रा. डॉ. शरद बावीस्कर मार्गदर्शन करतील. महिलांचा राजकीय सहभाग : मताधिकार, आरक्षण ते नेतृत्व या महत्त्वाच्या परिसंवादात राजदच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका भारती, खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि प्रा. डॉ. मृणालिनी अहेर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. Jijau Brigade Mahadhiveshan Chandrapur guest


या महाअधिवेशनाचा समारोपीय सोहळा दुपारी तीन वाजता पार पडेल. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, स्वागताध्यक्ष खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

+