police operations in chandrapur district । देशी कट्टा, तलवार सहित अवैध धारदार शस्त्रे जप्त, चंद्रपूर गुन्हेगारीचा नवा हॉटस्पॉट?

January 17, 2026 by Prakash Hande

police operations in chandrapur district

police operations in chandrapur district : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा गुन्हेगारीचा हब बनू पाहत आहे, सध्या नवे भाई म्हणून अल्पवयीन मुले पुढे येत आहे, जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असून हि पोलीस विभागासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी निर्माण होणार अशी शक्यता आहे. चंद्रपूर पोलीस विभागाने जिल्ह्यात देशी कट्टा, तलवार व धारदार शस्त्रे जप्त केले असून सदरची कारवाई घुग्गुस, मूल व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे.

मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमकं काय घडलं?

२६ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गुन्हे शोध पथकाला चंद्रपूर - मुल रोडवर, VP बियर शॉपी समोर नामे शोहेब पठाण, वय - २३ वर्षे, व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक हे त्यांचे ताब्यातील TVS jupiter मॉपेड वाहन डिक्की मध्ये धारधार शस्त्र ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने व गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मिळून आले. त्यांचे विरुद्ध कलम ४,२५ Arms act, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोहेब पठाण यास अटक करण्यात आली आहे. youth gang violence trends

घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशी कट्टा

२६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शास्त्रीनगर परिसरात गावठी बनावटीचा कट्टा सह एक जिवंत काडतूस जप्त केले. या धाडीत २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. घुग्गुस मधील वार्ड क्रमांक ५ शास्त्रीनगर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईत २८ वर्षीय सोनूलाल उर्फ नन्नू कैथल या युवकांकडून देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. Chandrapur Police Are Seizing Illegal Arms

चंद्रपूर पोलिसांनी युवकाला केली अमानुष मारहाण, गंभीर आरोप

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे व हिरालाल गुप्ता यांनी केली.

राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेल्वे वसाहत समोरील परिसरात सोनिया नगर मध्ये १९ वर्षीय युवकांकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर राजुरा पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Somayya institute of technology

चुनाभट्टी वॉर्ड राजुरा मध्ये राहणारा १९ वर्षीय अकिब नासिर खान या युवकाने स्वतःजवळ ८१ सेंटीमीटर लांबी ची लोखंडी तळावर ठेवली होती, मात्र काही गुन्हा घडण्यापूर्वी राजुरा पोलिसांनी छापामार कारवाई करीत तलवार जप्त केली. illegal weapons seizure

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफिक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवार, अविनाश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.

Leave a Comment

+