smart prepaid electricity meter audit demand । ⚡ बाबूपेठमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर वाद! आप ने केली ऑडिटची मागणी

January 17, 2026 by Prakash Hande

smart prepaid electricity meter audit demand

smart prepaid electricity meter audit demand : चंद्रपूर : बाबुपेठ परिसरामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे अनेक नागरिकांना वाढीव व अनियमित बिल येत असून परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत.

चंद्रपूर पाण्यात, जनजीवन विस्कळीत

आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देऊन बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ ऑडिट व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

तर आंदोलन करणार

पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

यावेळेस आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, हर्षल नेवलकर, जयदेव देवगडे, मनीष राऊत, अनुप तेलतुंबडे, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

+