Vaibhav Pimpalshende extortion case update : चंद्रपूर ३ डिसेंबर (News३४) - वाळूचा उपसा, वाहतुकीच्या कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे नेते वैभव पिंपळशेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी वैभव पिंपळशेंडे व शिवा कोरेवार यांच्यामधील संभाषणाची क्लिप चंद्रपूर जिल्ह्यात व्हायरल झाली होती, कोरेवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिली या आशयावर सदर क्लिप व्हायरल करण्यात आली मात्र खंडणी प्रकरणामुळे त्या संभाषणावर पडदा पडला आहे, वैभव पिंपळशेंडे यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील चेकवेळवाचा वाळूघाट लिलावात चंद्रपुरातील शिवकुमार शंकर कोरेवार यांना मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंपळशेंडे याने घाटातून वाळूचा उपसा, वाहतुकीच्या कामात अडथळे निर्माण करणे सुरू केले होते. घाट बंद पाडण्याच्या धमक्या त्याने शिवकुमार कोरेवार यांना दिल्या होत्या. पिंपळशेंडे यांच्या त्रासाला कंटाळून शिवकुमार कोरेवार यांनी ऑनलाइन पद्धतीने विविध तारखांना एकूण १ लाख ४३ हजार रुपये इतकी रक्कम दिली. Vaibhav Pimpalshende extortion case update
याशिवाय वाळूघाटावर असलेल्या सुपरवायझरकडून एक लाख रुपये पिंपळशेंडे यांनी घेतल्याचे कोरेवार यांनी तक्रारीत म्हटले. आतापर्यंत वैभव पिंपळशेंडे याने २ लाख ४३ हजार रुपयाची खंडणी घेतल्याची माहिती फिर्यादीने रामनगर पोलिसांना आपल्या तक्रारीत दिली. तक्रार मिळताच चंद्रपूर रामनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले.याप्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरू आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहाराची शहानिशा करण्यात येत आहे. या प्रकरणाची पोंभूर्णा तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.
Leave a Comment