चंद्रपूर महापालिका राजकारणात मोठा ट्विस्ट, जनविकास सेना-AIMIM आघाडी निर्णायक

January 23, 2026 by Prakash Hande

New Alliance Becomes Kingmaker : चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीत वडगाव प्रभागातून निवडणूक जिंकलेले जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख, मनिषा बोबडे व प्रतिक्षा येरगुडे तसेच एकोरी प्रभागातील एआयएमआयएमचे नगरसेवक अझहरुद्दीन शेख यांनी एकत्रित येऊन आज दिनांक 23 जानेवारी रोजी नवीन गटाची नोंदणी केली. नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात महानगर आघाडी,चंद्रपूर नावाने या गटाची नोंदणी करण्यात आली. (चंद्रपुरात बहुमताचा खेळ कोण जिंकणार?)

विशेष म्हणजे जनविकास सेनेने काँग्रेस सोबत निवडणूकपूर्व युती करून तीन जागांवर विजय मिळवला होता. एआयएम आयएम ने एकोरी प्रभागातून एका जागेवर विजय मिळवला. महानगर आघाडी,चंद्रपूर या गटाचे संख्याबळ चार झालेले आहे. सत्ता स्थापन करण्यात या गटाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. मात्र चंद्रपूर शहर महानगरपालिकेत स्वच्छ व पारदर्शक कारभार आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'काँग्रेस पक्षाने तशी हमी दिल्यास सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना निश्चितपणे पाठिंबा देऊ', या भूमिकेचा महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी पुनरुच्चार केला.

विशेष म्हणजे शिवसेना उबाठा-वंचित आघाडीने सुद्धा ८ नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी केली असून लहान गट आज किंगमेकरच्या भूमिकेत आले आहे. 

Leave a Comment

+