‘खोटा विकास, भ्रष्ट कारभार’ – वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात

January 17, 2026 by Prakash Hande

Vijay Wadettiwar speech : चंद्रपूर १० जानेवारी - विकासाच्या नावाखाली भाजपने चंद्रपूर वासियांची शहराची फसवणूक केली. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून चंद्रपूरचे वाटोळे केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी सभेत केली. (कमळ बघ विधानावर आमदार जोरगेवार यांची खोचक टीका)

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची कॉर्नर सभा पार पडली. या सभेत वडेट्टीवार यांनी भाजपच्या अपयशी, जनविरोधी आणि भ्रष्ट कारभारावर आसूड ओढत जनतेच्या मनातील असंतोषाला वाट करून दिली.

सर्वत्र अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव आणि यातून झालेली नागरिकांची गैरसोय असला खोटारडा विकास साधणारे व जनतेच्या प्रश्नांवर गप्प बसणाऱ्या नगरसेवकांना आता घरी बसवण्याची वेळ आली आल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी सभेत दिला.
ही निवडणूक खुर्चीसाठी नाही, तर चंद्रपूरच्या भवितव्यासाठी आहे. काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले तर प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष काम, पारदर्शक कारभार आणि जनतेला न्याय मिळेल,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. Vijay Wadettiwar speech

चंद्रपूर शहराच्या जनतेने महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती एकहाती सत्ता दिल्यास येथील नागरिकांच्या आरोग्य सेवेकरीता महानगरपालिकेचे स्वतंत्र रुग्णालय उभारणार, सोबतच शहरातील गोरगरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणाकरिता मोफत अशा इंग्रजी शाळा उघडणार असे आश्वासनही काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी दिले.

चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी मतदारांनी भाजपच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. आयोजित सभेस काँग्रेस ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, प्रभाग क्रमांक ६ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रिया आवळे, कलमती यादव, राजेश अडूर ,गिरीशचंद्र गुप्ता यांचे सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Comment

+