criminal with sharp weapon arrested : चंद्रपूर - गुन्हेगारांची दहशत हि चंद्रपूर शहरातून हद्दपार होताना सध्यातरी दिसत नाही आहे, हातात शस्त्र मिळाले कि परिसरातील नागरिकांना घाबरविण्याचे काम काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक करीत आहे, अशीच दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला शहर पोलिसाने १ जुलै रोजी बेड्या ठोकल्या.
चंद्रपुरात ३ जुलै रोजी भाजप आमदार विरोधात निषेध मोर्चा
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ ओव्हर ब्रिज च्या खाली महात्मा फुले चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार ४१ वर्षीय गणपत शंकर भुजोने हा हातात धारदार कोयता घेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकवीत दहशत माजवीत असल्याची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बाबुपेठ येथे पोहचत गणपत भुजोने ला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता एक धारदार लोखंडी कोयता जप्त केला.
आरोपी गणपत शंकर भुजोने वर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे व गुन्हे शोध पथकाने केली.
Leave a Comment