Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 । चंद्रपूरमध्ये गरजूंना मिळणार पक्कं घर!, रमाई आवास योजना'साठी अर्ज सुरू!

January 17, 2026 by Prakash Hande

Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025

Ramai Awas Gharkul Yojana Chandrapur 2025 : चंद्रपूर 1 ऑगस्ट -  चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरजू नागरी लाभार्थ्यांसाठी "रमाई आवास घरकुल योजना (शहरी)" राबविली आत असून या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 2 लक्ष 50 हजार (बीपीएल)  तसेच 2 लक्ष 25 हजार (बीपीएल) इतके आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या  घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या  ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. Urban Gharkul Yojana eligibility and documents

लाभार्थी पात्रता -

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
  • घरकुल बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात 2 लक्ष 50 हजार रुपयेच्या मर्यादेत करणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांपेक्षा जास्त नसावी.
  • घराचे बांधकाम चटई क्षेत्र 269 चौ. फूट राहील.
  • घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये मनपा हिस्सा १० टक्के राहील. दारिद्रयरेषेखालिल कुटुंबासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही.
  • अर्जदाराने यापूर्वी घरकुलासंबंधी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

आवश्यक कागदपत्रे:

  • जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा चालू वर्षाचा) –सत्य प्रत
  • रेशनकार्ड
  • घरटॅक्स पावती (चालू वर्षाची)
  • मतदान ओळखपत्र (व्होटर कार्ड)
  • दारिद्र्य रेषेखालील दाखला (असल्यास)
  • रहिवासी दाखला १५ वर्षांचा (तहसीलदार यांचा )
  • अर्जदारासोबतचा कच्चे घर/झोपडी/खुल्या भूखंडाचा फोटो (सद्यस्थितीतील)
  • अर्जदार पती/पत्नी यांचे पासपोर्ट फोटो
  • इलेक्ट्रिक बिल
  • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रातील नमुद कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र (रु. 100/- चा स्टॅम्प पेपरवरील नोटरी करणे)


अर्ज प्रक्रिया:
सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या घरकुल विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.

Leave a Comment

+