Maharashtra OBC loan scheme up to 1 lakh : चंद्रपूर : जनसामान्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजना राबविल्या जातात.
इतर मागास प्रवर्गातील व्यक्तीना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्याकरीता 1 लक्ष रुपयाची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परत फेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये 2085 रुपये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष पर्यंत असावे. OBC eligible loan schemes Maharashtra 2025
चंद्रपुरातील विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, हि शाळा नियमबाह्य
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्यांना बैंकमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
योजनेचे स्वरुप : 1. राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कार्य मर्यादा 10 लक्ष रुपयांपर्यंत. 2. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 20 लक्ष रुपयांपर्यत.
पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता 8 लक्ष रुपयांपर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा, तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 0.1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे किंवा 500 पेक्षा अधिक असावा, OBC educational loan reimbursement Maharashtra
कार्यपद्धती : सदर योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobefdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. interest subsidy OBC loan Maharashtra government
उद्देश : महाराष्ट्र राज्यातील समाजातील गरजू कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.
स्वरूप : बैंकमार्फत लाभार्थीना 15 लाखांपर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत), व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बैंक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. तसेच कुटुंबातील वार्षिक मर्यादा 8 लक्ष रुपयांपर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेब पोर्टल www.msobefde.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
5 लक्ष रुपयांपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना : बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा 5 लाखापर्यतच्या कृषी व संलन व्यवसाय वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील, सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता यईल. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपयांपर्यंतची असावी. Maharashtra OBC loan scheme up to 1 lakh
या महामंडळामार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर फोन क्रमांक 07172—262420 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
Leave a Comment