political speeches ban at Deekshabhoomi event | बहुजन हितकारिणी सभेचा इशारा: “धम्म मंचावरून राजकीय भाषण नाही चालणार!”

January 17, 2026 by Prakash Hande

political speeches ban at Deekshabhoomi event

political speeches ban at Deekshabhoomi event : चंद्रपूर १२ ऑक्टोबर News३४ - चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी 15,16 ऑक्टोंबरला धम्मचक्र अनुवर्तन सोहळा साजरा होतो, यानिमित्य प्रमुख प्रस्थापित पक्षाचे पुढारी धम्म मंचावरून राजकीय भाषणे करतात, अप्रत्यक्ष त्यांचे पक्षाचा प्रचार करतात , यावर्षी हे खपवून घेणार नाही , निषेध करू असा सज्जड इशारा बहुजन हितकारिणी सभेने एका निवेदनातून दिला आहे.

Also Read : सेल्फी विथ खड्डा, खासदार धानोरकर यांचा भन्नाट उपक्रम

दिनांक 9 ऑक्टो. ला नागवंश नगराळे यांचे नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी चंद्रपूर चे अध्यक्ष अरुण घोटेकर यांना एड. पूनमचंद वाकडे, विवेक कांबळे, एड. रवींद्र मोटघरे, बंडूभाऊ ठमके, विद्याधर लाडे, रवींद्र भैसारे, अशोक मुंजनकर, उषा तामगडे, बबिता बागेसर, कविता मून इ. च्या शिष्टमंडळाने यासंबंधी एक निवेदन सादर केले आहे . दीक्षाभूमीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय वापर होण्याला निर्बंध घालावे, तसे संबंधिताना नम्रपणे सुचित करावे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. Deekshabhoomi rules for public speeches

सोबतच धम्म मंचासमोरील मंडपाला दुप्पटीने वाढवून त्या प्रमाणात बसण्याची व्यवस्था उपलब्ध करावी , ही मागणी सुद्धा करण्यात आली आहे . दरवर्षी दीक्षाभूमीवर वाढत असलेली गर्दी लक्षात घेता लगतचे चांदा क्लब ग्राउंड दीक्षाभूमीला देण्यात यावे व नागपूर रोडवर टॉल लावण्यास परवानगी द्यावी या बहुजन हितकारिणी सभेने आंदोलनातून केलेल्या मागण्या प्रशासनाने अस्थायी स्वरूपात मागील वर्षीपासून मान्य केल्या हे येथे महत्वाचे आहे.

व्यवस्थेत बरेच बदल करण्याची गरज

तरीही या महोत्सवाचा उद्देश सफल होत नसल्याने आयोजनात आणि व्यवस्थेत बरेच बदल करण्याची गरज असल्याचे नागवंश नगराळे यांनी सोसायटीच्या लक्षात आणून दिले आहे. आंबेडकरी समाजाला माहित न होऊ देता दिक्षाभूमीवर ' अम्मा की पढाई' नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला होता, ते कळताच अनुयायानी बंद करण्यास भाग पाडले, यावरून संबंध आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्र असून दीक्षाभूमीच्या गैरवापराला कदापी सहन केले जाणार नाही हे स्पष्ट होते. political speeches ban at Deekshabhoomi event

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी ला महोत्सवाच्या आयोजनासाठी निधीची फार चणचण भासते , ते स्वतः हा खर्च उचलतात आणि काही प्रमाणात टॉल धारकाकडून धम्म दान मिळते ही बाब घोटेकर यांनी शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून दिली . त्यावर आयोजनातील व व्यवस्थेतील सुधारणा आणि शिस्त यावर्षी अनुयायांच्या नजरेस आणून दिल्यास पुढील वर्षीपासून समाजातून मोठ्या प्रमाणात धम्मदान मिळविण्यास पुढाकार घेऊ असे अभिवचन शिष्टमंडळाने दिले आहे.



Leave a Comment

+