crime branch action against cattle smugglers । चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

crime branch action against cattle smugglers : चंद्रपूर १ डिसेम्बर (News३४) - चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करीच्या २ कारवाईमध्ये ९ गोवंश, ४ म्हैस व १ वगार यांची सुटका करीत ७ आरोपींवर गुन्हा दाखल करून एकूण ३७ लक्ष ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिल्या कारवाईत ३० नोव्हेम्बर ला गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर अंतर्गत मौजा मानोरा रोडवर नाकाबंदी करीत तीन पिकअप वाहन क्रमांक MH३३ T०४५२, MH३४ BZ ५०८३ व MH ३४ BG ३९५६ यांना थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये ९ गोवंश जनावरे आढळून आले. सदर जनावरे हे कत्तलीकरिता कोंबून नेत होते. crime branch action against cattle smugglers

कारवाई : चंद्रपूर पोलिसांनी ३६३ जणांवर केली हद्दपारीची कारवाई

गुन्हे शाखेने या प्रकरणात २७ वर्षीय राहुल दशरथ नाकाडे, २५ वर्षीय अनिल नारायण सहारे, ३८ वर्षीय रामेश्वर अरुण करंबे तिन्ही राहणार ब्रह्मपुरी, ४३ वर्षीय रणजित पुंजाराम ढोंगे, व पाहिजे असलेला आरोपी पिंटू सय्यद राहणार ब्रह्मपुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ४९ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण २९ लक्ष ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. crime branch action against cattle smugglers

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दुसऱ्या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनोना फाटा परिसरात नाकाबंदी करीत गोवंश तस्करांचे वाहन क्रमांक MH २६ CH ३६०१ ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये ४ मग म्हैस व एक नग वगार कोंबलेल्या अवस्थेत होते. सदर जनावरे कत्तलीकरिता नेत होते, या प्रकरणी २४ वर्षीय पांडुरंग विठ्ठल तडेकोट व २८ वर्षीय तिरुपती तुळशीराम सादगिरे दोघेही राहणार नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ७ लक्ष ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवाईत पोलिसांनी ३७ लक्ष ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, पोलीस पथक कर्मचारी धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, जयंत चुनारकर, प्रदीप मडावी, अजित शेंडे, सुमित बरडे, प्रफुल गार्गात , नितेश महात्मे व मिलिंद टेकाम यांनी केली.

Leave a Comment

+