Sardar Patel College media students । जनसंवाद चे विद्यार्थी पोहोचले चंद्रपूर आकाशवाणीवर – अनुभवली प्रसारणाची दुनिया!

January 17, 2026 by Prakash Hande

Sardar Patel College media students

Sardar Patel College media students : चंद्रपूर - येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थांनी नुकतीच चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज नेमके कसे चालते हे जाणून घेतले. दरम्यान यावेळी विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाले. Chandrapur Akashvani visit

चंद्रपूरच्या मातीत मौल्यवान वस्तूंचा खजिना

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे उद्दिष्ट असलेले आकाशवाणी…मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध झाले असले तरी आकाशवाणी मात्र श्रोत्यांच्या मनात आपली जागा कायम राखून आहे. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जनसंवाद विभागाचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट दिली. यावेळी जनसंवाद विभागप्रमुख डॉ. पंकज मोहरीर, प्रा. संजय रामगिरवार, प्रा.अरविंद खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. जनसंवाद विभागाचे विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते.

चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे अभियंता चंद्रकांत मत्ते, राजन देशभ्रतार, तंत्राद्य किशोर वसाके, विकास बावणे यांनी केंद्राचे प्रसारण कसे होते हे तंत्रज्ञान विद्यार्थांना समजून सांगितले. यावेळी सहायक संचालक (तांत्रिक) संध्या किलनाके याही उपस्थित होत्या. विद्यार्थांनी आकाशवाणी कार्यक्रमाचे लेखन, नभोवाणी चर्चा, वृतांत याविषयीचीही माहिती कार्यक्रम प्रमुख व अधिकारी नंदा गजभिये यांच्यासह प्रसारण अधिकारी उमेश दुपारे उद्घोषक मंजुषा भास्करवार, हेमा बहादे,अर्चना चौधरी यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी 'फोन -इन' अंतर्गत 'हॅलो फर्माईश' मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. Akashvani Chandrapur working

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

Contents

Leave a Comment

+