Shiv Sena UBT campaign : चंद्रपूर ११ जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, शहरातील एमईएल प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोर वाढलेला दिसत आहे. अनुसूचित जाती अ गटातील उमेदवार युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
मागील अनेक वर्षांपासून राजकारण व समाजकारणात सहभाग घेतलेले विक्रांत सहारे यांनी आपल्या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी पाऊले उचलत मनपा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. १० जानेवारीला विकृत सहारे यांनी प्रभागात मोठी प्रचार रॅली काढली. (चंद्रपुरात वाघाचा मृत्यू)
या प्रचार रॅलीत असंख्य महिला-पुरुषांनी सहभाग घेतला विशेष बाब म्हणजे वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे सुद्धा प्रचार रॅलीत सहभागी झाले. पक्षातील तरुण आज मनपा निवडणुकीत उभा असल्याने आमदार देरकर यांनी त्याला साथ देत प्रचारात सहभाग घेतला. Shiv Sena UBT campaign
देशात बदलत असलेल्या राजकारणात युवकांनी पुढे यावे अशी मागणी होत असताना विक्रांत सहारे सारखा नवयुवक या क्षेत्रात आला, आता प्रभागातील जनतेची सेवा करण्याचा निर्धार उराशी बाळगत सहारे यांनी मनपा निवडणुकीत सहभाग घेतला आहे, एमईएल प्रभाग अनेक समस्यांनी वेढला आहे, आजही प्रभागातील नागरिकांना मूलभूत सेवा मिळत नाही आहे, त्या सर्व बाबी निवडून आल्यावर मी पूर्ण करणार असा वचननामा सहारे यांनी मतदारांपुढे जाहीर केला आहे.
विक्रांत सहारे यांच्या प्रचार रॅली मध्ये तरुण-तरुणी सह महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.
Leave a Comment