sanitation workers rights violation Chandrapur । कामगार रडतायत… व्यवस्था मौन!, घंटागाडी कामगारांचा आक्रोश, आप' उतरली मैदानात!

January 17, 2026 by Prakash Hande

sanitation workers rights violation Chandrapur

sanitation workers rights violation Chandrapur : १० जुलै चंद्रपूर - चंद्रपूर : शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट या खाजगी संस्थेला सोपविण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना अलीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. ही बाब केवळ अन्यायकारकच नव्हे, तर मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

पाणी कराची वसुली करण्यासाठी चंद्रपुरात येणार वॉर्ड सखी

असे असताना कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांशी सातत्याने गैरवर्तन, मेडिकल सुट्टी नाकारणे, कामाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी न देणे यासारख्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता, असुरक्षितता आणि असंतोष वाढत चालला आहे. Chandrapur municipal contract worker dispute

या अन्यायाविरोधात आज आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने मा. महानगरपालिका आयुक्त व कामगार सहायक आयुक्त चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात खालील ठाम मागण्या करण्यात आल्या:

🔹 अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

🔹 पीडित कामगारांना १५ दिवसांच्या आत पुन्हा सेवेत बहाल करण्यात यावे.

🔹 कंपनीच्या मनमानी कारभारावर महानगरपालिकेने लक्ष घालावे.

🔹 कामगारांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे.

https://youtube.com/shorts/ftN1oNGC340?si=A4NG9F-T4elRFzjN

जर वरील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीच्या वतीने घंटागाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

+