चंद्रपूर प्रभाग १६ : बगूलकर विरुद्ध वैरागडे, कोण मारणार बाजी?

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur Prabhag 16 Election : चंद्रपूर १२ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहे, शहरातील प्रभाग १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी मधील सर्वसाधारण गटात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सर्वसाधारण गटातून तब्बल २० उमेदवार निवडणुकीच्या रीगणात उभे आहे. ज्यामध्ये राजकीय पक्षांचे ८ उमेदवार तर १२ उमेदवार हे अपक्ष लढत आहे. (मतदारांनो मतदान केंद्र असे शोधा)

भारतीय जनता पक्षाने यंदा मागील माजी नगरसेवकांना संधी दिली आहे, त्यामध्ये फक्त अनुसूचित जाती गटात माजी नगरसेवकाची पत्नी उमेदवार आहे. भाजपच्या माजी नगरसेवक कल्पना बगूलकर यांना वर्ष २०१७ मध्ये २ हजार २३० मते मिळाली होती. ९५७ मतांनी भाजपचा विजय झाला होता. मात्र ८ वर्षानंतर होत असलेल्या मनपा निवडणुकीतील समीकरणे यंदा वेगळी आहे.

मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव होता, त्यावेळी ११ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र यंदा सर्वसाधारण प्रवर्ग राखीव असून २० उमेदवारांनी या गटातून शड्डू ठोकले आहे. प्रभाग क्रमांक १६ मधील सर्वसाधारण गटातून भाजपच्या माजी नगरसेवक कल्पना बगूलकर यांची थेट लढत कांग्रेसच्या चंदा वैरागडे यांच्यासोबत आहे.

चंद्रपूर मनपा निवडणुकीत कांग्रेस व भाजपने उमेदवारी देताना अनेक चुका केल्या आहे. त्यामुळे बंडखोर दोन्ही पक्षांना आव्हान देण्याचे काम करीत आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. खरी लढत हि कांग्रेस विरुद्ध भाजप असून अपक्ष उमेदवार फक्त मतांची विभागणी करणार निर्णायक मते अपक्ष घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती सर्वसाधारण गटात आहे.

प्रभागात समस्यांचा डोंगर

प्रभाग १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी मध्ये भाजप व कांग्रेसच्या उमेदवार यांचा प्रचार शिगेला पोहोचला असून कांग्रेसकडून खासदार प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चा सांभाळला आहे. वर्ष २०१७ च्या मनपा निवडणुकीनंतर प्रभागातील समस्या पूर्णतः संपल्या नाहीत, केंद्राद्वारे सुरु केलेल्या अमृत योजनेचे पाणी नागरिकांच्या दारात पोहोचले असले तरी आजही पाणी एक दिवसाआड येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खड्ड्यात गेले आहे. भाजपच्या कल्पना बगूलकर यांनी मनपा मध्ये प्रशासक बसल्यावर सुद्धा प्रभागात जनसंपर्क सुरु ठेवला होता. Chandrapur Prabhag 16 Election

वर्ष २०१७ च्या निवडणुकीत कांग्रेसच्या चंदा वैरागडे यांनी सुद्धा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना ४७६ मते मिळाली होती, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, जिल्ह्यात कांग्रेस पक्षाला नगर परिषद निवणुकीत भरघोस यश प्राप्त झाले, चंदा वैरागडे ह्या प्रभागातील चर्चेत असलेले नाव आहे. त्या चंद्रपूर शहर महिला कांग्रेसच्या अध्यक्षा सुद्धा आहे. बचत गटातील महिलांचा भरगच्च पाठिंबा त्यांच्या मागे आहे.

प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ मधील सर्वसाधारण गटातून कोण बाजी मारणार याच उत्तर १६ जानेवारीला मिळणारचं.

Leave a Comment

+